CoronaVirus विरार नालासोपाऱ्याची चिंता वाढली; पालिका हद्दीत 11 कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 09:35 PM2020-05-09T21:35:46+5:302020-05-09T21:36:03+5:30
संख्या पोहचली 200 वर ; शनिवारी 3 कोरोना मुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई-विरार शहर महापालिका हद्दीत शनिवारी वसई वगळता विरार व नालासोपारा भागात सर्वाधिक 11 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर यामध्ये विरार पूर्व पश्चिम मध्ये सर्वाधिक असे 7 पुरुष रुग्ण असून त्याच्या पाठोपाठ नालासोपाऱ्यात हि 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे.
त्यामुळे शनिवारी आढळून आलेल्या एकूण कोरोना बाधितांची संख्या आता थेट 200 वर पोहचली असून वसई विरार पालिका हद्दीतील रुग्णालयातुन शनिवारी 3 रुग्ण देखील मुक्त झाल्याची माहिती पालिकेने दिली. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी आढळून आलेल्या रुग्णामध्ये वसईतून एकही रुग्ण सापडला नाही,तर विरार मध्ये सर्वाधिक 7 पुरुष व नालासोपारात 2 पुरुष आणि 2 महिला असे मिळून एकूण 11 रुग्ण बाधित आढळून आल्याने पालिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे नालासोपाऱ्यात आढळून आलेल्या 54 वर्षीय व 21 वर्षीय दोघी महिला या जोगेश्वरी येथील रुग्णालयास भेट दिल्याने त्या बाधित आढळून आल्या आहेत.तर विरार मधील एक 47 वर्षीय रुग्ण हा बाधित रुग्णाच्या हायरिस्क संपर्कांत आहे.
तर उर्वरित विरार व नालासोपारा मध्ये आढळून आलेले 8 पुरुष रुग्ण यात हॉटेल कर्मचारी ,केटरिंग स्टा फ,फूड वितरक,पाणीपुरवठा विभाग ,रुग्णालय कर्मचारी आणि हॉटेल कर्मचारी असे हे मुंबईत काम करणारे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
दरम्यान या रुग्णावर वसई ,नालासोपारा व मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु असून वसई विरार हद्दीत बाधित रुग्णाची एकूण संख्या 200 तर पालिका हद्दीत 8 जण मयत झाले आहेत.
तर शनिवारी पालिका हद्दीत नालासोपारा पूर्वेतून 2 आणि विरार पूर्व -1 असे मिळून 3 रुग्ण मुक्त झाल्याने आता या मुक्त रुग्णाची एकूण संख्या ही 104 वर गेली आहे. तर आजवर 88 बाधित रुग्णावर वसई, नालासोपारा आणि मुंबईत विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत
दि.9 मे 2020 शनिवार ची कोरोना- रुग्णांची आकडेवारी
विरार -7 पुरुष
नालासोपारा -2 पुरुष ,2 महिला
विरार -2 पुरुष
एकूण रुग्ण संख्या -11
वसई-विरार शहरातील एकूण रुग्ण संख्या -200
कोरोना मुक्त संख्या :- 104
कोरोना ग्रस्त मयत संख्या :- 8
उपचार घेत असलेली रुग्ण संख्या :-88