महानगरपालिकेचे ५९ लाख पाण्यात; शहरातील १७ हॅण्डवॉश सेंटर वापराविना पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 12:32 AM2020-08-27T00:32:49+5:302020-08-27T00:33:33+5:30

मात्र नागरिकांची उदासिनता, पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे शहरातील सर्व हॅण्डवॉश सेंटर वापराविना पडून आहेत.

Corporation's 59 lakh in water; Falling without using 17 handwash centers in the city | महानगरपालिकेचे ५९ लाख पाण्यात; शहरातील १७ हॅण्डवॉश सेंटर वापराविना पडून

महानगरपालिकेचे ५९ लाख पाण्यात; शहरातील १७ हॅण्डवॉश सेंटर वापराविना पडून

Next

नालासोपारा : वसई-विरार महापालिकेने कोरोनाच्या काळात ठिकठिकाणी लावलेले हात धुण्याच्या केंद्रांचा वापर होत नसल्याने महानगरपालिकेचे ५९ लाख ५० हजार रुपये पाण्यात गेले आहेत. या केंद्रातील नळ चोरीला गेले असून गर्दुल्यांनी या हॅण्डवॉश सेंटरला आपला अड्डा बनवला आहे. रात्री किंवा दुपारच्या सुमारास काही जण या ठिकाणी झोपतात. तर भाजीवाल्यांनीही त्या सेंटरवर कब्जा केला आहे.

कोरोना हा विषाणू हातावाटे नाकातोंडात जातो. त्यामुळे हात वारंवार धुण्याचा, सतत सॅनिटायझर लावण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला. वसई-विरार महापालिकेने शहरातील सर्व इमारतींना प्रवेशद्वारावर हात धुण्याचे सॅनिटायझर (हॅण्ड वॉश बेसिन) बनविणे अनिवार्य केले. त्याचबरोबर शहरातील नागरिकांना कुठेही हात धुता यावे, निर्जंतुकीकरण करता यावे यासाठी लाखो रूपये खर्चून हॅण्ड वॉश सेंटर तयार केले. त्यासाठी लाखो रु पये खर्च करण्यात आले.

मात्र नागरिकांची उदासिनता, पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा यामुळे शहरातील सर्व हॅण्डवॉश सेंटर वापराविना पडून आहेत.
महानगरपालिकेने शहरातील १७ ठिकाणी नागरिकांसाठी हॅण्ड वॉश सेंटर उभारले होते. मात्र त्यावर कुणाची देखरेख नसल्याने या हॅण्डवॉश केंद्रातील नळ चोरीला गेले आहेत. काही ठिकाणी तर गर्दुल्यांनी आपला अड्डा बनविला आहे. त्यामुळे सामान्य नागरिक तेथे फिरकतदेखील नाही. घाईघाईने घेतलेल्या या निर्णयाने पालिकेचा पैसा पाण्यात गेल्याचे बोलले जात आहे. एका हॅण्डवॉश सेंटरसाठी साडेतीन लाख रुपये खर्च पालिकेने केला आहे. शहरात वसई येथील पापडी, पारनाका, रेंज आॅफिस, गावराई नाका, गोलानी नाका, अंबाडी रोड, सातिवली तर नालासोपाºयात ५ ठिकाणी आणि विरार येथे २ ठिकाणी असे एकूण १७ हॅण्डवॉश सेंटर असून पालिकेचा ५९ लाख ५० हजार रुपये खर्च पाण्यात गेला आहे.

शहरात १७ ठिकाणी हॅण्डवॉश सेंटर उभारली आहेत. नागरिकांनी कोरोनाला दूर ठेवण्यासाठी या केंद्रातून हात धुवावेत. नंतर आम्ही या हॅण्डवॉश सेंटरचा उपयोग कायमस्वरूपी पाणपोईसाठी करणार आहोत. त्यामुळे पैसे वाया गेले असे म्हणता येणार नाही. - राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, वसई-विरार महानगरपालिका

Web Title: Corporation's 59 lakh in water; Falling without using 17 handwash centers in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.