अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:34 PM2021-02-25T23:34:54+5:302021-02-25T23:42:24+5:30
महापालिकेने उमर कंपाउंडमधील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई केली.
नालासोपारा : वसई-विरार महानगरपालिकेच्या ‘एफ’ प्रभागातील मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या पेल्हारमधील उमर कंपाऊंडमध्ये गुरुवारी सकाळी मोठी कारवाई करून अनेक अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.
महापालिकेने उमर कंपाउंडमधील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई केली. या कारवाईत सुशील आव्हाड याचे दोन हजार चौरस मीटरचे वीट सिमेंट पत्र्याचे बांधकाम, अर्षद चौधरी व सैजाद खान याचे ३ हजार ४०० चौरस फुटांचे आरसीसी गोदाम, ५ हजार २०० चौरस फुटांचे लोखंडी अँगल, सैजाद खान याचे ९ हजार ४०० चौरस फुटांचे वीट, सिमेंट आणि पत्र्याचे बांधकाम, सैजाद खान याचे २ हजार ८०० चौरस फुटांचे वीट, सिमेंट आणि पत्र्याचे बांधकाम आणि सुशील आव्हाड याचे पंधरा हजार चौरस मीटरचे वीट, सिमेंट पत्र्याचे बांधकाम तोडण्यात आले. सदर कारवाईत एकूण मिळून ३८ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त केले असल्याचे सहायक आयुक्त मोहन संखे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.