महामंडळाची गोदामे मोडकळीस
By admin | Published: February 2, 2016 01:42 AM2016-02-02T01:42:30+5:302016-02-02T01:42:30+5:30
पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात आदिवासी विकास महामंडळाची अनेक गोदामे जुनी व मोडकळीस झाली आहेत. ही जुनाट व धोकादायक झाले
जव्हार : पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात आदिवासी विकास महामंडळाची अनेक गोदामे जुनी व मोडकळीस झाली आहेत. ही जुनाट व धोकादायक झाले तरीही त्यांची कित्येक वषार्पासून दुरुस्तीच झालेली नाही. तरीही त्यात शासनाचा लाखो रुपयांचा माल हा रामभरोसे ठेवला जात आहे. त्यातच कर्मचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून त्यात काम करावे लागते आहे.
जव्हार तालुक्यातील चालतवड, वडवली, भरसटमेट, कौलाळे, तर विक्रमगडमध्ये साखरे, दाद्डे, कऱ्हे, कुर्झे, आलोंडा, मोखाड्यातील पाळसुंडा, मोखाडा, खोडाळा, या ठिकाणी रेशनिंग व आश्रम शाळेचं धान्य साठविण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने गोदामे बांधण्यात आली आहेत. ती अनेक दशकांपूर्वी बांधण्यात आली असून त्यांची कोणतीही देखभाल झालेली नाही. त्यामुळे काहींचे दरवाजे, खिडक्या, छप्पर नाहीसे झाल आहे. तर काहींच्या भींतींना तडा जाऊन त्या कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. या गोदामांवर धोकादायक ईमारत असा बोर्ड लावण्याची वेळ आली आली आहे. एकाधिकार, आधारभूत, न्यूक्लिअस बजेट, रेशनिंग धान्य, व इतर शासकीय योजनांचा माल, महामंडळाने खरेदी केलेला माल याच गोडाऊनमध्ये ठेवला जात आहे. हा सर्व माल गोडाऊन किपरच्या भरवशावर ठेवला जातो. या प्रकारामुळे मालाची चोऱ्या, लूट, नुकसान होते व त्याबद्दल गोडावून किपरला जबाबदार धरले जात आहे. त्यामुळे येथील कर्मचारी नेहमी मानसिक तणावाखाली कामे करत आहेत. (वार्ताहर)