नगरसेवक जाधव यांच्यावर एमआरटीपी

By admin | Published: May 28, 2016 02:30 AM2016-05-28T02:30:16+5:302016-05-28T02:30:16+5:30

अनधिकृत बांधकामाप्रकरणी बहुजन विकास आघाडीचे नालासोपाऱ्यातील नगरसेवक अरुण जाधव ांच विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात एम.आर.टी.पी.चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Corporator Jadhav gets MRTP | नगरसेवक जाधव यांच्यावर एमआरटीपी

नगरसेवक जाधव यांच्यावर एमआरटीपी

Next

विरार : अनधिकृत बांधकामाप्रकरणी बहुजन विकास आघाडीचे नालासोपाऱ्यातील नगरसेवक अरुण जाधव ांच विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात एम.आर.टी.पी.चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तमुळे जाधव यांचपुढील अडचणी आता वाढल आहेत.
अरुण जाधव भागिदारी असलेल स्पर्श डेव्हलपर्सने तुळींज येथील सर्वे क्र ९९ हिस्सा क्र.१ या जमिनीवर अनधिकृत इमारती उभारली होती. सदर इमारत उभारणसाठी बोगस सातबारा उतारा, सी.सी., सिडको अप्रुवल प्लान, इंडे्नक्स आदी कागदपत्रांचा वापर करण्यात आला असलची तक्रार कुमार काकडे यांनी केली होती.
काकडे यांनी दिलेल कागदपत्रांच आधारे महापालिकेने अरुण जाधव यांचे दिवंगत वडील हरिश्ंचद्र जाधव यांचवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आपल्यावरही कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेवून अरुण जाधव यांनी अटकपुर्व जामीनासाठी वसई न्यायालयात अर्ज केला होता. या त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे याप्रकरणी त्यांना ताब्यात घेवून चौकशी करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून त्यांचा अटकपुर्व जामीन न्या.एस.व्ही.भरुका यांनी फेटाळला होता. तसेच जाधव यांचविरोधात गुन्हा रजी. क्र.३१। १६ अन्वये कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४ अन्वे गुन्हा दाखल झाला असून तपासात तसे निष्पन्न झाल्यामुळे अप्पर जिल्हा सत्र न्याालयाने त्यांचा जामीन फेटाळला होता. मात्र, मुबई हायकोर्टाने त्यांना याप्रकरणी अंतरिम जामीन दिल्याने दिलासा मिळाला होता. (प्रतिनिधी)

आता त्यांच अडचणी पुन्हा
अरुण जाधव यांनी मौजे तुळींज येथील सर्वे.क्र.९९ हिस्सा क्र .१ या जागेवर गणेशधाम या इमारतीच्या ३ विंंग अनधिकृतपणे उभारल्या आहेत. याप्रकरणी त्यांना १३ मार्च २०१६ ला नोटीस बजावून सदर बांधकाम पाडून टाकणे आणि त्याचा वापर थांबवणेस कळवण्यात आले होते.
जाधव यांनी या नोटीसीचे पालन केले नसून अनधिकृत बांधकामव जागेचा वापर चालु ठेवल्यामुळे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमनुसार त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी फिर्याद महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रेमसिंग जाधव यांनी तुळींज पोलीस ठाण्यात दिली.

Web Title: Corporator Jadhav gets MRTP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.