उद्या बुलेट ट्रेन विरोधात परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 01:18 AM2018-06-02T01:18:31+5:302018-06-02T01:18:31+5:30

महाराष्ट्र व गुजरात मधील स्थानिक जनतेच्या घराना आणि बागायतींना उध्वस्त करीत जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या विरोधात

Council against bullet train tomorrow | उद्या बुलेट ट्रेन विरोधात परिषद

उद्या बुलेट ट्रेन विरोधात परिषद

Next

पालघर : महाराष्ट्र व गुजरात मधील स्थानिक जनतेच्या घराना आणि बागायतींना उध्वस्त करीत जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या विरोधात महाराष्ट्रातील विविध संघटना व देश पातळीवरील नेते पालघर येथे ३ जून रोजी एकत्र येत असून पालघर लायन्स क्लब मैदान येथे आयोजित बुलेट ट्रेन विरोधी जनमंचावर आपली भूमिका मांडणार आहेत.
महाराष्ट्र व गुजरात मधील संघटनांच्यावतीने या कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले असून या जनमंचावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माकपचे कॉ. अशोक ढवळे, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार धैर्यशील पाटील, जनता दल सेक्युलरचे शरद पाटील आदी उपस्थित राहून भूमिका मांडतील.
वसई व पालघर तसेच डहाणू , तलासरी तालुक्यातील ७३ गावातील शेतकरी भूमिपुत्रांची सुमारे ६७० एकर जमीन तर गुजारात राज्यातील ८ तालुक्यातील एकूण ६१२.१९ हेक्टर जमीन व दादरा नगर हवेलीतील ७.५२ हेक्टर जमीन संपादित होणार आहे.
जिल्ह्यात या आधीच घोषित झालेल्या वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी, आरोवाना जेट्टी आद विनाशकारी प्रकल्पामध्ये येथील शेतकरी-आदिवासी-भूमिपुत्रांच्या जमिनी संपादन होत असताना बुलेट ट्रेनसाठी होणाºया जमिन संपादनास लोकांचा मोठा विरोध असला तरी बुलेट ट्रेनचे अधिकारी कर्मचारी गावा-गावात जाऊन अनेक आमिषे दाखवीत आपला सर्व्हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आजवर काँग्रेस राष्ट्रवादी सेना मनसेसह सर्वच राजकीय पक्षांनी बुलेट ट्रेनला आपला विरोध दर्शविलेला आहे. मात्र ज्या जिल्ह्यातून बुलेट ट्रेन जाणार आहे त्या जिल्ह्यातील आदिवासी-शेतकर्यांच्या असलेल्या विरोधी पाशर््वभूमीवर सर्व नेते एकाच व्यासपीठावर येऊन आपली भूमिका मांडणार असल्याने या कार्यक्र माकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुलेट ट्रेन बाधितांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Council against bullet train tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.