कुपारी संस्कृतीचा वसईत बोलबाला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 02:21 AM2018-12-28T02:21:59+5:302018-12-28T02:22:09+5:30
वसईतील सामवेदी बोलीभाषा व संस्कृतीला उजाळा देण्यासाठी सामवेदी ख्रिस्ती कृपारी संस्कृती मंडळाने एक दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले होते.
वसई : वसईतील सामवेदी बोलीभाषा व संस्कृतीला उजाळा देण्यासाठी सामवेदी ख्रिस्ती कृपारी संस्कृती मंडळाने एक दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले होते. बुधवारी राजोडी येथील महोत्सव नगरी पारंपारिक वेषभूषेतील हजारो स्त्रिया व पुरूषांनी गजबजून गेला होता. यंदाचे महोत्सवाचे सातवे वर्ष होते. या महोत्सवाचा आरंभ संस्कृती दिंडीने झाला.
वसईतील सामवेदी ख्रिस्ती कुपारी समाजाचा मानबिंदू असलेला सातवा कुपारी संस्कृती महोत्सव बुधवारी संध्याकाळी लोबो फार्म, सेंट जोसेफ कॉलेजसमोर, सत्पाळा-राजोडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेवर बोली भाषेतील ‘तरी, महोत्सवा करता खास आग्रहाआ वारना’ अर्थात महोत्सवासाठी सर्वांना आग्रहाचे आमंत्रण देण्यात आले होते. पुरातन संस्कृतीचा गौरव करणाऱ्या कुपारी संस्कृती महोत्सवात लाल लुगडे घातलेल्या स्त्रिया, लाल टोपी, धोतर घातलेले हजारो पुरु ष यामुळे जणू जुनी वसई अवतरल्याचे दिसून येत होते.
महोत्सव नगरीच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन विशेष निमंत्रित फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले. ‘मानवतेच्या अन मानवाच्या अस्तित्वासाठी जगभरातील सर्व बोलीभाषा व संस्कृती टिकल्या पाहिजेत. असे आवाहन फादर दिब्रिटो यांनी यावेळी केले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी फादर फिलीप घोन्सालवीस तर प्रमुख अतिथी म्हणून सिस्टर लुसी ब्रिटो या होत्या. यावेळी बेसिन केथॉलिक बँकेचे अध्यक्ष ओनील आल्मेडा, उपाध्यक्ष युरी घोन्सालवीस, बँक संचालक यांच्यासह संस्थागौरव म्हणून उत्तर वसई ज्ञानदीप मंडळ अध्यक्ष बावतीस ब्रिटो, सिरील मिनेझसि, प्रा. नरेश नाईक, फादर इग्नेशियस मच्याडो व स्व. सि. डॉमेतिला रोड्रीग्ज यांच्यासाठी कुटूंबीयांचा शाल, मानपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सामवेदी ख्रिस्ती कुपारी संस्कृती मंडळाचे अध्यक्ष जिम रॉड्रीग्ज उपस्थित होते.
संध्याकाळी ४:३० वाजता सत्पाळा येथून सर्वप्रथम संस्कृती दिंडीस सुरूवात करण्यात आली. प्रवेशद्वारासमोरील बावखलावरील जिवंत रहाटाचे मॉडेल आकर्षणाचा केंद्रबिंदू होते. सदर महोत्सव कार्यक्र मात कुपारी समाजाचा साहित्यिक अलंकार ‘पाशीहार’ या महोत्सव विशेषांकाचे व कुपारी दिनदर्शिका-२०१९ चे प्रकाशन करण्यात आले.
सामवेदी बोलीत आयोजित कुपारी कथा, कविता, कुपारी रेसिपी स्पर्धेचा निकाल घोषित करु न विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. तर
क्र ीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामिगरी केलेल्या खेळाडूंना मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भव्य लकी ड्रॉ बक्षीस योजना हेही विशेष आकर्षण ठरले. मंचावरु न कार्यक्र म, भाषणे फक्त सामवेदी बोलीभाषेत सादर झाली.
कृपारी महोत्सवात वसईची जुनी संस्कृती अवतरल्याचा आभास होत होता.वसईत पिकणारी विविध जातीची केळी ,परंपारिक शेती अवजारे या महोत्सवात मांडण्यात आली होती. महिला गटामार्फत विविध खाद्यपदार्थ्यांचे स्टाँल लावण्यात आले होते.
रँवाळा, दाँदाल, पानमोड्यो, वालाई भाजी, इंदेल अशा पारंपारिक तिखटगोड कृपारी खाद्यांनाच येथे
विक्र ी करण्यास मुभा होती. हजारो खवय्यांनी यथेच्छपणे याचा आस्वाद घेतला. बालजत्रेचे आयोजनही या महोत्सवात करण्यात आले होते. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या महोत्सवास जवळपास वीस हजार कृपारी समाज बांधवांनी हजेरी लावली होती. यावेळी आपल्या पारंपारिक भाषेत एकमेकांना साद घालण्यात आली.
दिंडीत सजवलेल्या पालखीतल्या बायबलला मानवंदना'
अंजेरी गाव परिवाराच्या उत्साही सहभागातून निघालेल्या भव्य संस्कृती शोभयात्रेत संस्कृती प्रेमी बैलगाड्या, जुन्या संस्कृतीचे दर्शन घडवीत बँडच्या तालावर वाजतगाजत सामील झाले होते. भारतीय संस्कृती गौरवपर पालखी शोभायात्रेच्या आरंभ स्थानी होती.
दिंडीत सजवलेल्या पालखीत बायबल ठेवण्यात आले होते. बँण्डच्या तालावर पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले बैलगाड्यावर बसून महोत्सवाच्या ठिकाणी निघाले होते. संस्कृती दिंडी महोत्सवाच्या प्रवेशद्वारावर पोहोचताच त्याचे फूलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले.