क्रिकेटचा सट्टाबाजार तेजीत, दररोज लाखोंचा गेम, शेकडो संसार बर्बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 06:34 AM2017-11-30T06:34:58+5:302017-11-30T06:35:03+5:30
डहाणू तालुक्यात खास करून शहरामध्ये क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात सट्टाबाजार सुरु असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
- शौकत शेख
डहाणू : तालुक्यात खास करून शहरामध्ये क्रिकेटवर मोठ्या प्रमाणात सट्टाबाजार सुरु असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. विशेष म्हणजे झटपट पैसे कमाविण्याच्या नादात येथील शेकडो सुशिक्षित तरुण, आई, वडीलांना न कळवत क्रिकेटचा खेळावर पैसे लावून कंगाल होत आहेत. या सट्ट्यामध्ये शहरातील लहान सहान व्यापारी काही कारखानादारां बरोबरच काही नोकरी, व्यवसाय करणारे तरुणही आकर्षित झाले आहेत. पोलिसांनी या बुकींवर कठोर कारवाई करून हे रॅकेट उध्वस्त करावे, अशी मागणी येथील काही पालक तसेच नागरीकांकडून होत आहे.
सध्या बांगलादेश येथे सुरु असलेल्या बी.पी.एल. मॅचवर रात्र, दिवस सट्टा लावला जात आहे. डहाणूतील काही बुकी या क्रिकेट मॅच वर सट्टा घेतात. त्यात एक बुकी तर डहाणू पोलीसठाण्यापासून हाकेच्या अंतरावर (मागच्या इमारतीत) आहे. तो डहाणूत राहून क्रिकेटवर सट्टा घेतो. परंतु पोलिसांना दाखविण्यासाठी त्यांनी मीरारोड येथे राहत असल्याचा देखावा केला आहे. प्रत्येक विकेट, ओवर, किती रन होणार, कोण मॅच जिंकणार तसेच प्रत्येक बॉलवर शेकडो लोकांकडून कमी जास्त मोबदल्यात दररोज लाखोंचा जुगार खेळला जात आहे. क्रिकेट सुरू झाल्यावर डहाणूतील बुकीने ठेवलेल्या फंटर मार्फत मोबाईल संभाषणाने सट्टा बुकींग घेतली जाते. डहाणूतील काही उपहारगृह, सलून तसेच पानटपरी बरोबरच बुकीने ठेवलेल्या फन्टर मार्फत दररोज सकाळी पैसे वसूल करण्याचे काम होत आहे. आज पर्यंतचा इतिहास पाहता सट्टा लावणाºयापेक्षा दुप्पट, तिप्पट फायदा बुकीचाच झाल्याचे दिसून येते. त्यामुळे असंख्य जुगाºयांचे संसार उध्वस्त झाले आहे.
दरम्यान बांगलादेश येथे चालणाºया दरोजच्या दोन मॅचवर डहाणूतील असंख्य सुशिक्षित बेरोजगार बर्बाद होत असतांना दिसत आहेत. आई, वडीलाने शाळा, महाविद्यालय तसेच घरगुती कामांसाठी दिलेले पैसे, तसेच लहान सहान दुकानात झालेली कमाई हे तरुण सट्ट्यावर लावून कर्जबाजारी झाल्याची चर्चा डहाणू शहरात होत आहे. शहरातील एक तरुण गेल्या वर्षी सुरु असलेल्या मॅचवर रात्रभर पंधरा लाख हरल्यानंतर सकाळी त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अशा तºहेने अनेक तरुणांची दयनीय अवस्था झाली आहे.
क्रिकेटवर सट्टा घेणारे बुकी कोण आहे. पोलिसांना माहिती नाही का? पोलीस का? मग ते कारवाई का करीत नाही? असा प्रश्न डहाणूच्या नागरीकांकडून होत असून पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी होत आहे.