बेकायदा तलाकप्रकरणी पती-सासूवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 05:32 AM2020-03-02T05:32:03+5:302020-03-02T05:32:15+5:30

वसईत राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेला पैशांसाठी मारहाण करून लग्नात दिलेल्या स्त्रीधनाचा अपहार करत बेकायदेशीर तलाक दिला.

Crime against husband and mother-in-law in illegal divorce | बेकायदा तलाकप्रकरणी पती-सासूवर गुन्हा

बेकायदा तलाकप्रकरणी पती-सासूवर गुन्हा

Next

नालासोपारा : वसईत राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेला पैशांसाठी मारहाण करून लग्नात दिलेल्या स्त्रीधनाचा अपहार करत बेकायदेशीर तलाक दिला. या प्रकरणी पती आणि सासूविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात पीडितेने गुन्हा दाखल केला आहे.
वसई पश्चिमेकडील एव्हरशाईन इस्टेट परिसरात राहणाºया मुस्सरत शाहनवाझ शेख (२९) हिचा शाहनवाझ (३२) याच्याशी २ नोव्हेंबर २०१३ रोजी विवाह झाला होता. सासू जहाना (५०) आणि पतीने लग्न झाल्यापासून वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. हुंडा म्हणून लग्नात चार लाख रु पये रोख रक्कम तसेच ७ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या घेऊनही मुस्सरत यांच्या आई-वडिलांकडे वारंवार पैशांची मागणी केली. पतीने सासूसमोर तोंडी तलाक दिल्याची तक्र ार पीडितेने शनिवारी संध्याकाळी दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime against husband and mother-in-law in illegal divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.