हॉस्पिटल बंद ठेवून सेवा न देणाऱ्या वसईतील खाजगी डॉक्टरवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 02:57 PM2020-04-27T14:57:47+5:302020-04-27T14:58:05+5:30

जिल्ह्यातील किंबहुना वसई तालुक्यातील पहिला गुन्हा ठरला आहे.

Crime against a private doctor in Vasai for not providing services by keeping the hospital closed mac | हॉस्पिटल बंद ठेवून सेवा न देणाऱ्या वसईतील खाजगी डॉक्टरवर गुन्हा

हॉस्पिटल बंद ठेवून सेवा न देणाऱ्या वसईतील खाजगी डॉक्टरवर गुन्हा

googlenewsNext

- आशिष राणे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला पालघर जिल्हाधिकारी व त्यांनतर पुन्हा वसई -विरार शहर महापालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील असंख्य डॉकटर्स व त्यांच्या खाजगी दवाखाने ,रुग्णालय आदीना आपली सेवा व दवाखाने सुरु ठेवण्या संदर्भात वारंवार विनंती वजा सूचना आणि नोटीसा हि या पूर्वी पालघर जिल्हाधिकारी तथा तत्कालीन पालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिल्या होत्या.

वसई- विरार महापालिका हद्दीत कोरोना व्यतिरिक्त व इतर आजारी रुग्णांसाठी डॉक्टर म्हणून सेवा देणाऱ्या व नोटीस बजावून देखील महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत हॉस्पिटल उघडे न ठेवणाऱ्या वसई रोड, नवघर स्थित एच प्रभाग अंतर्गत एका डॉक्टर वर पालिकेचे आरोग्य निरीक्षक जितेंद्र नाईक यांनी फिर्याद दाखल करून माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी लोकमत ला दिली  .

डॉक्टर प्रवीण कुमार असे या गुन्हा दाखल झालेल्या आरोपी डॉक्टरचे नाव असून नवघर माणिकपूर शहरातील वसई रोड येथील दत्तात्रय शॉपिंग सेंटर,पार्वती टॉकीज जवळ हे हॉस्पिटल -क्लीनिक असल्याचे हि फिर्यादी यांनी म्हंटले आहे.

दरम्यान पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार महापालिका एच प्रभाग यांच्या हद्दीतील खाजगी हॉस्पिटल व दवाखाने बंद असल्याबाबत असंख्य तक्रारी आल्या होत्या. त्या संदर्भात सर्व खाजगी हॉस्पिटल व दवाखाने यांना पालिका कार्यालयाकडून जावक क्र.6150 /2019 -20  दि.31 /03 /2020  च्या पत्रानुसार पालिका हद्दीतील बंद असलेल्या खाजगी हॉस्पिटल व दवाखान्यांच्या डॉक्टरांनी दवाखाने उघडण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या होत्या.

त्याप्रमाणे पालिका हद्दीतील बहुतांश डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडले परंतु डॉ. प्रवीण कुमार यांनी त्यांचे खाजगी हॉस्पिटल 31 मार्च 2020 ते 25 एप्रिल 2020  या काळात व अद्यापही बंद ठेवून प्रभाग समिती एच मार्फत पाठवलेल्या त्या पालिकेच्या आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी अखेर पालिकेचे नवघर विभागीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक जितेंद्र नाईक यांनी माणिकपूर पोलिसात धाव घेत रविवारी डॉक्टर प्रवीण कुमार यांच्या विरद्ध गुन्हा रजि.क्र.183 /2020 नुसार भा.दं.वि.स कलम १८८,२६९,सह साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 मधील खंड 2 .3 .4 सह आप्पती व्यवस्थापन अधि.2005 मधील कलम 51 (ब ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे पालिका हद्दीतील म्हणा अथवा तालुक्यातील डॉक्टरवर दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा म्हणावा लागेल. वसई विरार शहर महापालिका हद्दीत बहुतांश डॉकटर्स व त्यांचे दवाखाने सुरु ठेवत नसल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी पालघर व महापालिका आयुक्त प्रशासनाकडे आल्यावर दवाखाने सुरु ठेवा अन्यथा गुन्हे दाखल करू परवाना रद्द करू असे अनेकदा डॉक्टरांना आवाहन स्वरूपात सांगण्यात आले होते.

प्रसंगी राज्य सरकार ने डॉक्टरांनी या आणीबाणीत कोविड व्यवतिरिक्त देखील रुग्णांना सेवा देणे बाबत आर्जव वजा आवाहन केले होते त्यासाठी अनेकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी हि आवाहन केले मात्र सर्वत्र त्यास राज्यभर पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही.आणि अखेर पालिका हद्दीत किंवा वसई तालुक्यात म्हणा अथवा पालघर जिल्ह्यत हा असा पहिला गुन्हा पालिका प्रशासनास दाखल करणे भाग पडले.  

वसई विरार मध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.त्याच सोबत इतर किरकोळ किंवा कोविड व्यतिरिक्त आजारी नागरिकांना व रुग्णांना आजारी झाल्यावर पालिका हद्दीतील डॉक्टरकडे जाणे झाल्यास त्या सेवा आज खाजगी डॉक्टरांनी बंद केल्या आहेत त्यामुळे प्रशासनाने नोटिसा देऊनही हे बंद दवाखाने डॉकटर मंडळी उघडत नाहीत,सदरची गंभीर बाब व तक्रार आपण नवनियुक्त आयुक्त  गंगाथरन देवराजन यांच्याकडे केल्यावर त्यांनी सर्व प्रभाग समिती सहायक आयुक्तांना तातडीने दवाखाने व हॉस्पिटल न उघडणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा असे आदेशच आयुक्तांनी दिले असल्याने  त्यातील हि एक पहिली  कारवाई असून याचे आम्ही स्वागत करतो.  -मिलिंद चव्हाण, उपशहरप्रमुख, शिवसेना वसई रोड 

Web Title: Crime against a private doctor in Vasai for not providing services by keeping the hospital closed mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.