धुडगूस घालणाऱ्या श्रमजीवी कार्यकर्त्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 06:12 AM2018-10-21T06:12:56+5:302018-10-21T06:12:58+5:30
रेशन कार्डाच्या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयात घुसून अधिकाºयांना शिवीगाळ करून घोषणाबाजी करणा-या श्रमजीवीच्या कार्यकर्ते व पदाधिका-यांवर तलासरी पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.
तलासरी : रेशन कार्डाच्या मागणीसाठी तहसीलदार कार्यालयात घुसून अधिकाºयांना शिवीगाळ करून घोषणाबाजी करणा-या श्रमजीवीच्या कार्यकर्ते व पदाधिका-यांवर तलासरी पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. श्रमजीवीचे पदाधिकारी विजय जाधव, गणेश पवार, कैलास तुंबडा, रु पेश ढोले, छाया पागी, भरत डोंबरे अशी त्यांची नावे आहेत.तहसीलदारांच्या केबिनमध्ये घुसून हा गोंधळ घातला. सोमवारी श्रमजीवी संघटनेच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी तलासरी तहसीलदार स्वाती घोंगडे यांनी रेशन कार्डाच्या मागण्या मान्य करून ज्याची कागदपत्रे पूर्ण आहेत अशांना रात्रीच रेशन कार्ड देणार असे सांगितले होते. काम सुरू असताना रात्री संघटनेचे पदाधिकारी पोलिसांना धक्काबुक्की करून तहसीलदारांच्या केबिनमध्ये घुसले आणि तहसीलदार, नायब तहसीलदारांना शिवीगाळ विरोधात घोषणा दिल्या.