Crime: मेकअप आर्टिस्ट तरुणीची गुजरातमध्ये केली हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह भरून फेकला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:29 PM2023-09-13T12:29:40+5:302023-09-13T12:30:03+5:30

Crime: बेपत्ता असलेल्या २८ वर्षीय मेकअप आर्टिस्ट तरुणीची गुजरात राज्यात हत्या झाल्याचे उघड झाल्याने वसईत खळबळ माजली आहे. तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून वलसाड येथील खाडीत फेकून देण्यात आला आहे.

Crime: Make-up artist killed in Gujarat, body dumped in a suitcase | Crime: मेकअप आर्टिस्ट तरुणीची गुजरातमध्ये केली हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह भरून फेकला

Crime: मेकअप आर्टिस्ट तरुणीची गुजरातमध्ये केली हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह भरून फेकला

googlenewsNext

नालासोपारा : बेपत्ता असलेल्या २८ वर्षीय मेकअप आर्टिस्ट तरुणीची गुजरात राज्यात हत्या झाल्याचे उघड झाल्याने वसईत खळबळ माजली आहे. तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून वलसाड येथील खाडीत फेकून देण्यात आला आहे. नायगाव पोलिसांनी सोमवारी रात्री हत्या, हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी मनोहर शुक्ला (वय ४३) याला अटक केली आहे.

नायगावच्या सनटेक इमारतीत राहणारी नयना महंत (वय २८) ही तरुणी सिनेमात मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायची. १२ ऑगस्टपासून ती बेपत्ता असल्याने तिच्या बहिणीने १४ ऑगस्टला हरवल्याची तक्रार नायगाव पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिस तपासात नयनाची हत्या तिचा पूर्वीचा प्रियकर मनोहर शुक्ला (४३) याने केल्याचे उघड झाले आहे.

आरोपी माजी प्रियकर 
नयना महंत ही पूर्वी वसईला राहत होती. सिनेसृष्टीत काम करणाऱ्या आरोपी मनोहर शुक्लाबरोबर तिचे प्रेमसंबंध होते, मात्र तो विवाहित असल्याचे समजल्यानंतर तिने हे संबंध तोडले. वालीव पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा मागे घेण्यासाठी शुक्ला तिच्यावर दबाव टाकत होता. याच कारणावरून हत्या करुन पुरावा नष्ट केल्याने गुन्हा दाखल केला आहे.

 तिची पाण्यात बुडवून हत्या केली आणि मृतदेह सुटकेसमध्ये भरला. ती सुटकेस आरोपीने गुजरातच्या वलसाड येथील खाडीत टाकून दिली. पोलिसांना तिचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपी मनोहर शुक्लाला मंगळवारी सकाळी अटक केली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले - श्रींगी यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Crime: Make-up artist killed in Gujarat, body dumped in a suitcase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.