रिक्षाच्या नावावरून उलगडला खुनाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 12:23 AM2019-03-06T00:23:04+5:302019-03-06T00:23:23+5:30

शुक्रवारी दुपारी ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत योगिता देवरे हिची हत्या करून डी मार्टच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत फेकून दिलेला तिचा मृतदेह सापडला होता.

The crime of murder in the name of Rickshaw | रिक्षाच्या नावावरून उलगडला खुनाचा गुन्हा

रिक्षाच्या नावावरून उलगडला खुनाचा गुन्हा

Next

नालासोपारा : शुक्रवारी दुपारी ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत योगिता देवरे हिची हत्या करून डी मार्टच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत फेकून दिलेला तिचा मृतदेह सापडला होता. या हत्येचा छडा पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने लावला असून चौघांना अटक केली व फरार तिघांचा शोध सुरू आहे.
नालासोपारा पूर्वेकडील डी मार्ट जवळील साई सिद्धांत काँप्लेक्स मधील बी/402 मध्ये सुशील मिश्रा आणि हत्या झालेली योगिता देवरे हे राहत होते. सुशील मिश्रा याने तीन लग्न केलेल्यापैकी एक बायको उत्तर प्रदेश, दुसरी बायको पार्वती माने पूर्वेकडील डॉन लेन येथे दोन मुलींसोबत राहत होती तर तिसरी बायको मयत योगिता त्याच्यासोबत राहत होती. पार्वती माने ही पती सुशील हा पैसे व शरीरसुख देत नसल्याने व मुलींकडेही लक्ष देत नसल्यामुळे नाराज होती. पार्वतीने आपल्या अल्पवयीन मुलींसोबत मिळून योगीताचा काटा काढण्यासाठी प्लॅन आखून हत्या करण्याकरिता मदत म्हणून ओळखीच्या माणसाला बोलावले तर दोन्ही मुलींनी आपापल्या प्रियकराला सोबत घेतले. लहान मुलीच्या प्रियकराने आपल्या मित्राला या कटात सामील करून घेतले. २८ फेब्रुवारीला सुशील हा लग्नकार्यासाठी अहमदाबादला गेला होता आणि याच दिवशी योगीताचा खून करायचे या ७ जणांनी ठरवल्यानंत रात्री १२ च्या सुमारास बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकाला खूप दारू पाजवून त्याच्या रूममध्ये नेऊन झोपवले. योगिता ही घरी झोपेत असताना ओढणीच्या साहयाने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली. मोठ्या मुलीचा प्रियकर शैलेश काळे याने त्याचा मित्र नीरज मिश्रा याची रिक्षा (क्र मांक एम एच 48 बी एफ 1317) खोटे कारण सांगून आणली होती त्यात योगीताचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून रिक्षातून नेऊन मोकळ्या जागेत फेकून दिला होता. या रिक्षाच्या पाठी मागे लिहलेल्या जान्हवी हे नाव सीसीटिव्हीच्या शूटींगमध्ये चित्रीत झाले. त्यावरून छडा लागला.

Web Title: The crime of murder in the name of Rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.