राजीवली प्रकरणी चाळमाफियांवर गुन्हे; पालिकेचे अधिकारी मोकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 02:24 AM2018-02-25T02:24:55+5:302018-02-25T02:24:55+5:30
राजीवली परिसरात बेकायदा चाळी उभारणाºया सात चाळ माफियांविरोधात महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्यास चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २१ हल्लेखोरांची धरपकड करण्यात आली आहे.
- शशी करपे
वसई : राजीवली परिसरात बेकायदा चाळी उभारणाºया सात चाळ माफियांविरोधात महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्यास चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी २१ हल्लेखोरांची धरपकड करण्यात आली आहे. मात्र, यात अनेकांचे संसार उघड्यावर आले असून बेकायदा बांधकामांना खतपाणी घालणाºया महापालिका अधिकाºयांवरही गु्न्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
राजीवली परिसरात महसूल, वन, आदिवासी यासह खाजगी जागांवर अतिक्रमण करून चाळमाफियांनी एक हजारांहून अधिक बेकायदा चाळी बांधल्या आहेत. गुरुवारी महापालिकेने या ठिकाणी बुलडोझर फिरवण्यास सुरुवात केल्यानंतर जनक्षोभ निर्माण झाला. चारशे लोकांच्या जमावाने महापालिका आणि पोलिस अधिकारी-कर्मचाºयांवर हल्ला चढवला होता. ाात काही पोलीस आणि महापालिका कर्मचारी जखमी झाले होते. तर हल्लेखोरांनी जेसीबी, कार, मोटार सायकलींना आगी लावल्या होत्या.
याप्रकरणी वालीव पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून २१ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच प्रमुख बिल्डर रंधा सिंह याच्यासह विकास सिंग, मनोज सिंग मिळून सात चाळमाफियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे सर्वजण फरार झाले आहेत. तसेच पोलिसांनी घटनास्थळी काही गाड्या जप्त केल्या असून त्यावरून हल्लेखोर बाहेरून आल्याचा संशय आहे. त्यामुळे गाड्यांच्या मालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.
चाळ माफियांबरोबरच अधिकारीही जबाबदार
याठिकाणी एक हजारांहून अधिक चाळी बांधल्या गेल्या आहेत. पालिकेने लोकांना घराबाहेर काढून खोल्या पाडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या चाळी गेल्या अनेक दिवसांपासून बांधण्याचे काम केले जात असताना पालिका अधिकारी-कर्मचाºयांनी त्यावर का कारवाई केली नाही असा संतप्त सवाल भाजपाचे नालासोपारा शहर सरचिटणीस मनोज बारोट यांनी केला आहे. याभागातील संंबंधित अधिकाºयांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी बारोट यांनी केली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले असले तरी मुख्य सूत्रधार दारा आणि रंधा मोकाट आहेत. यापूर्वी त्यांच्याविरोधात खूनासारखे गंभीर गुन्हे ही दाखल आहेत. त्यामुळे यात सहभागी असलेल्या चाळमाफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी माजी आमदार विवेक पंडित यांनी केली आहे.