जव्हारमध्ये शंभरचा आकडा पार; 54 रुग्णांचे अहवाल प्रलंबीत, 45 रुग्ण बरे होऊन घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 05:07 PM2020-06-28T17:07:39+5:302020-06-28T17:07:46+5:30

जव्हार तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख झपाट्याने वाढला

Cross the number one hundred in Jawahar; Reports of 54 patients pending, 45 patients cured at home | जव्हारमध्ये शंभरचा आकडा पार; 54 रुग्णांचे अहवाल प्रलंबीत, 45 रुग्ण बरे होऊन घरी

जव्हारमध्ये शंभरचा आकडा पार; 54 रुग्णांचे अहवाल प्रलंबीत, 45 रुग्ण बरे होऊन घरी

Next

- हुसेन मेमन

जव्हार तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून आजतागायत 101 रुग्णांची नोंद करण्यात आली असून, 54 रुग्णांचे अहवाल प्रलंबीत आहेत, तसेच यातील 45 रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची दिलासादायक बातमी आहे.

तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आलेख झपाट्याने वाढला, मात्र तितक्याच वेगाने लक्षणे नसलेल्या रुग्णांना काही दिवस आयसोलेशन कक्षात उपचार करून घरी सोडले असून, येत्या दोन तीन दिवसात आणखीन रुग्णांना घरी सोडले जाण्याची चिन्हे आहेत. 

तसेच आरोग्य विभागाच्या दि. 6 जून 2020 च्या परिपत्रकानुसार कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तीसाठी घरी करावयाच्या विलगिकरणाबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत, त्यामुळे परिपत्रकानुसार ज्या व्यक्तीकडे सुविधा उपलब्ध आहेत अशा दोन रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात आलेले आहे. 

Web Title: Cross the number one hundred in Jawahar; Reports of 54 patients pending, 45 patients cured at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.