साकाईदेवीच्या नवरात्रोत्सवास भाविकांची अलोट गर्दी

By admin | Published: October 14, 2015 02:21 AM2015-10-14T02:21:39+5:302015-10-14T02:21:39+5:30

वसई-विरार उपप्रदेशात एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या उमेळे येथील साकाईदेवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.

The crowd of devotees of Navratri festival of Sakai devi | साकाईदेवीच्या नवरात्रोत्सवास भाविकांची अलोट गर्दी

साकाईदेवीच्या नवरात्रोत्सवास भाविकांची अलोट गर्दी

Next

दिपक मोहिते, वसई
वसई-विरार उपप्रदेशात एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या उमेळे येथील साकाईदेवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. साकाई अर्थात सकलजनांची आई असा लौकिक असणाऱ्या या देवीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक दरवर्षी हजेरी लावतात. या देवीची महती मुंबई, ठाणे परिसरात दूरपर्यंत आहे.
चार वर्षापूर्वी या देवीच्या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. १९ व्या शतकाच्या सुरूवातीस उमेळे गावाच्या हद्दीतील सोपाराखाडीत मच्छीमारी करण्यास गेलेल्या मच्छीमारांना या देवीचे प्रथम दर्शन झाले. त्यांनी ही मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे सारे प्रयत्न असफल झाले. मूर्ती जागची हलली नाही. त्याच दिवशी उमेळे गावच्या एका ज्येष्ठ नागरीकास देवीने दृष्टांत देत याच गावात माझे स्थान व्हावे अशी इच्छा प्रगट केली. त्यानंतर ग्रामस्थांनी ही मूर्ती गावात आणली आणि मोठ्या भक्तीभावाने घुमट बांधुन त्यात देवीची प्रतिष्ठापना केली. १९३० मध्ये या घुमटाचे रुपांतर मंदिरात झाले. ही देवी उमेळे ग्रामवासीयांची ग्रामदेवता तर अनेकांची ती कुलस्वामीनी आहे. तालुक्यात सातही देवींची मंदिरे आहेत. रुपे तसेच नावे भिन्न असली तरी ती साक्षात दुर्गामातेचीच रुपे आहेत. नवरात्रोत्सवात या मंदिरात विविध धार्मिक विधीसह सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात व या सर्व उपक्रमास वसईकर जनतेचा भरभरून प्रतिसाद लाभत असतो.

Web Title: The crowd of devotees of Navratri festival of Sakai devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.