समुद्रकिनारी घोड्यांना क्रूर वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:08 PM2019-01-31T23:08:38+5:302019-01-31T23:08:51+5:30

वसईतील सुरुची बाग येथील प्रकार; क्षमतेपेक्षा कोंबले जातात जास्त प्रवासी

Cruel behavior | समुद्रकिनारी घोड्यांना क्रूर वागणूक

समुद्रकिनारी घोड्यांना क्रूर वागणूक

Next

वसई : येथील समुद्रकिनारी असलेल्या सुरुची बाग येथे पर्यटकांना रपेट घडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांना क्रूर वागणूक देत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका घोडागाडीत दहा प्रवासी बसवून रपेट घडविली जात आहे. वाळू माफियांनी केलेल्या वाळू चोरी मुळे हा किनारा पार खचून गेला आहे. तरीही पर्यटकांचा ओघ हा घटलेला नाही, याउलट तो दिवसागणिक वाढतोच आहे. मुख्य रस्त्यापासून किनाºयावर जाण्यासाठी ३ कि. मीटर चा तुटका रस्ता आहे.

वाढत्या पर्यटनामुळे या रस्त्यावरून किनाºयावर जाण्यासाठी तीन चाकी आणि चार चाकी गाड्यांना बंदी घातली आहे. त्यामुळे येथे फक्त दुचाकी आणि घोडागाडी पर्यटकांना या सुरुची बाग किनाºयावर पोहोचविण्याचे काम करते. विशेष म्हणजे वसई सोडून इतर भागातून येणारे पर्यटक मजा म्हणून या घोडागाडीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. हे पाहता घोडागाडीचा चालक एका सवारीवर ९ ते १० पर्यटकांना एकाच वेळी बसवून प्रवास घडवित आहे. एकूणच या राबणाºया घोड्यांसाठी मात्र हा जीवघेणा प्रवास असून तो दररोज या किनाºयावर पहावयास मिळत आहे. रविवारी सायंकाळी १० पर्यटकांनी भरलेली घोडागाडी अचानक खाली कोसळली. जास्त वजन असल्याने या घोड्याला ते झेपले नाही आणि शेवटी ही गाडीच कोसळली.

या अपघातात घोड्याच्या पायाला जबर दुखापत झाली तरी देखील या घोड्याला पुन्हा टांग्याला जुंपले गेले असल्याने प्राणीमित्रांत हळहळ व्यक्त होत आहे. या बाबत घोडागाडी चालकास विचारणा केली असता त्याने उडवाउडवी ची उत्तरे दिली. तसेच हा घोडा दहा जणांचे वजन पेलवू शकतो म्हणून आम्ही जास्त प्रवासी घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले, परंतु मुक्या घोड्यांवर राजरोस अत्याचार करणाºयावर मात्र कोणाचाही लगाम नसल्याची मोठी खंत व्यक्त होत आहे. याबाबत कुणाकडे आणि कशी तक्रार करावी असा प्रश्न येथील प्राणीमित्रांना पडला आहे. मालक घोड्यांची कोणतीही काळजी घेत नाहीत.
 

Web Title: Cruel behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.