रुग्णालयाला टाळे ठोकणारे निर्दोष
By admin | Published: February 24, 2017 06:50 AM2017-02-24T06:50:48+5:302017-02-24T06:50:48+5:30
आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याने ग्रामीण रुग्णालयाला टाळे ठोकणाऱ्या मनसे कार्यकत्याची
मनोर : आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याने ग्रामीण रुग्णालयाला टाळे ठोकणाऱ्या मनसे कार्यकत्याची चार वर्षांनी अखेर पालघर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. विजय संखे यांनी त्यांची बाजू न्यायालयात मांडली.
ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी अपुरे असल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. त्या अनुषंगाने कुंदन संखे यांनी ठाणे येथे वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. तिची दखल न घेतल्याने अखे एप्रिल २०१३ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मनोरच्या ग्रामीण रुग्णालयाला जबी राऊत, नाविद शेख, नारायण स्वरा, मंगेश बोरकर, रत्नदीप एडवनकर, गणेश घोलप, सबान शेख आदींनी टाळे ठोकले त्या वेळी त्यांच्या विरोधात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता तेंव्हापासून पालघर न्यालायत हा खटला सुरु होता गेल्या चार वर्षा नंतर आज न्यायाधीश नंदा बी घाटके यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून टाळे ठोकणाऱ्यांची निर्दोष सुटका केली.
वकील विजय संखे यांनी कुंदन संखे व इतर आरोपींच्या निर्दोष मुक्ततेसाठी प्रयत्न केले. त्या वेळचे मनसे चे जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे व आताचे मनसे कार्यकर्ते यांची निर्दोष सुटका झाल्याबद्दल मनसेच्या कार्यकर्त्यांंनी जल्लोष केला. या कार्यकर्त्यांनी जनतेच्या हितासाठी हे आंदोलन केले होते त्यात त्यांचा कोणताही स्वार्थ नव्हता. हे लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिल्याबद्दल मनसेने समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)