‘संस्कृती केवळ धर्माशी जोडू नये तर ती कला, संगीत, साहित्यात शोधा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:09 PM2019-05-03T23:09:10+5:302019-05-03T23:09:48+5:30
देशातील आजच्या वातावरणात सर्व संस्कृतीनी एकत्र येणे गरजेचे आहे. धर्म जन्मातून येतो. मानवता, करूणा, प्रेम, सहिष्णूता हाच धर्म असावा. समाजाकडे निकोप दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे.
पारोळ : देशातील आजच्या वातावरणात सर्व संस्कृतीनी एकत्र येणे गरजेचे आहे. धर्म जन्मातून येतो. मानवता, करूणा, प्रेम, सहिष्णूता हाच धर्म असावा. समाजाकडे निकोप दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. संस्कृती केवळ धर्माशी जोडू नये. तर कला, संगीत, शिल्प आणि साहित्य म्हणजे संस्कृतीच, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिका, कवियत्री निरजा यांनी वसईत बोलताना केले.
वसई मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त बंगली येथील लोकसेवा सभागृहात विशेष कार्यक्र माचे आयोजन केले होते. नीरजा यावेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. यावेळी स्व. अॅन्थोनी तुस्कानो यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी सुरू केलेला ‘गार्डवेल पुरस्कार’ ज्येष्ठ कवियत्री डॉ. सिसिलिया कारव्हालो यांना निरजा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
त्याच प्रमाणे यावेळी को.म.सा.प, वसई शाखेचे अध्यक्ष, तथा लीलाई चे संस्थापक संपादक अनिल राज रोकडे, लेखक फ्रान्सिस लोपीस, लेस्ली डायस, कवी मायकल लोपीस,फ्लोरी रॉड्रिग्ज , स्वेद चे संपादक संदीप राऊत, लेखक जॉन घोन्सालविस, एफिजीन तुस्कानो, विन्सेंट आल्मेडा, जुराण लोपीस यांचा त्यांच्या साहित्य आणि सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.