विद्यमान आमदाराची माजी आमदारांविरोधात पोलिसात तक्रार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 07:49 PM2022-02-10T19:49:55+5:302022-02-10T19:50:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  मीरारोड - मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी माजी आमदार नरेंद्र मेहतां विरुद्ध केलेल्या तक्रारी नंतर ...

Current MLA Geeta jain lodges complaint against former MLA narendra Mehta | विद्यमान आमदाराची माजी आमदारांविरोधात पोलिसात तक्रार 

विद्यमान आमदाराची माजी आमदारांविरोधात पोलिसात तक्रार 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी माजी आमदार नरेंद्र मेहतां विरुद्ध केलेल्या तक्रारी नंतर नवघर पोलिसांनी मेहतांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे . 

एका वृत्तवाहिनीवर आ . जैन यांचा भाऊ संजय पुनमिया तसेच शहरातील विकासक सुनील जैन यांच्या बाबतीत आलेल्या बातमीचा हवाला देऊन आ. जैन विरुद्ध नरेंद्र मेहतांनी  व्हिडीओ क्लिप व्हायरल केली . पुनामिया व  सुनील यांनी मेहतांचे कॉल डिटेल्स काढल्याच्या बातमीच्या अनुषंगाने मेहतांनी व्हिडीओ क्लिप मध्ये चोरीने झाली आमदार , जनता रहे सावधान अश्या प्रकारचे वक्तव्य करून समाजा मध्ये असलेली प्रतिमा मालिन करून अब्रुनुकसानी केली म्हणून अदखलपात्र गुन्हा ७ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी दाखल केला आहे . 

मेहता हे सातत्याने आपल्या बद्दल द्वेष बाळगून आहेत . आताअश्या प्रकारे  तर त्यांनी संविधान, शहरातील जनता व निवडणुक प्रक्रिये वरच संशय व्यक्त करून आपली बदनामी चालवली आहे . जागरूक जनतेने मेहतांना पराभवाची धूळ का चारली हे जनतेला माहिती आहे . कॉल डिटेल्स काढून निवडणूक जिंकता येते म्हणणे हास्यास्पद आहे . मेहतां विरुद्ध आपण न्यायालयात दावा दाखल करणार आहोत असे आमदार गीता जैन म्हणाल्या. 

Web Title: Current MLA Geeta jain lodges complaint against former MLA narendra Mehta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.