नगरसेवकाला दोन मुलांसह अटक व सुटका

By admin | Published: July 10, 2016 12:23 AM2016-07-10T00:23:09+5:302016-07-10T00:23:09+5:30

एका बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला केल्याप्रकरणी वसई विरार पालिकेतील बहुजन विकास आघाडीच्या नगसेवकाला त्याच दोन मुलांसह तुळींज पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक

Custody and release with two children | नगरसेवकाला दोन मुलांसह अटक व सुटका

नगरसेवकाला दोन मुलांसह अटक व सुटका

Next

वसई : एका बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून त्याला केल्याप्रकरणी वसई विरार पालिकेतील बहुजन विकास आघाडीच्या नगसेवकाला त्याच दोन मुलांसह तुळींज पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली असून त्याना शनिवारी जामिन मंजूर करण्यात आला.
प्रभाग क्रमांक ७१ चे नगरसेवक सिताराम गुप्तांवर तुळींज पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा गुन्हा दाखल झाल्याची घटना घडली आहे. याआधी त्यांचवर ८ गुन्हे दाखल होते. नगरसेवक सीताराम सुदामा गुप्ता यांच्यावर नालासोपारा आणि तुळींज पोलीस स्टेशनमध्ये तब्बल ८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले होते. त्यात काल रात्री आणखी एका गुन्ह्याची भर पडली.
नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क येथे राहणारे बांधकाम व्यवसायिक जगदीश दुबे (४९) यांनी नगरसेवक सिताराम गुप्ता आणि त्यांची मुले अनिल सिताराम गुप्ता, अरविंद सिताराम गुप्ता यांना २०१० मध्ये वाणगाव हायवेवरील मौजे गोवणे गावातील जमीन विकली होती. या व्यवहारात २० लाख रुपये जगदीश दुबे यांना गुप्ता परिवाराने दिले होते व उरलेली रक्कम थोडी थोडी करून देणार असे सांगितले होते. व्यवहार पूर्ण न झाल्याने वकीलातर्फे जगदीश दुबे यांनी व्यवहार स्थगित झाला म्हणून नोटीस पाठवली होती. पण जगदीश दुबे यांनी गुप्ता परिवाराकडून जागेसाठी घेतलेले २० लाख रुपये सौदा स्थगित होऊनसुद्धा परत न दिल्याने गेल्या काही दिवसापासून वाद सुरू होते.
गुप्ता यांनी या आधी साधारण सात आठ महिन्यांपूर्वी नालासोपाऱ्यात अनाधिकृत हॉस्पिटल सुरु केले होते. त्याविरोधात तक्रारी आल्यानंतर वसई-विरार महानगरपालिकेने त्या हॉस्पिटल ला टाळे ठोकून कारवाई केली होती. (प्रतिनिधी)

पैसे परत न केल्याचा राग
वीस लाख रुपये परत न दिल्याचा राग मनात धरून शुक्रवारी गुप्ता यांनी आपल्या दोन मुलांसह दुबे यांचे अपहरण केले. दुपारी २ च्या सुमारास पडघा येथे कामानिमित्त बाईकवर जगदीश दुबे गेले होते.
त्यांना खडवली येथे रस्त्यात अडवून मारहाण, शिवीगाळ करत अनिल गुप्ता आणि अरविंद गुप्ता यांनी त्यांच्या स्वत:च्या इनोव्हा कारमध्ये जबरदस्तीने बसवून नालासोपारा संतोष भवन येथील सिताराम गुप्ता याच्या कार्यालयात घेऊन आले. याठिकाणी दुबे यांचा मुलगा कौशल दुबे याला कार्यालयात बोलावून दुकान आणि फ्लॅटचे कागदपत्रे आणून आमच्या नावावर कर असा दम देत आज नाही केले तर संपूर्ण परिवार संपवून टाकेन अशी धमकी देत शिवीगाळ करण्यात आली.
दुबे यांनी गुप्ता यांच तावडीतून सुटका करून तेथून पळ काढत तुळींज पोलीस स्टेशन गाठले. दुबे यांच्या तक्रारीनंतर गुप्तांसह त्यांच दोन मुलांवर अपहरण, मारहाण, शिवीगाळ, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Custody and release with two children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.