ग्राहकांची फसवणूक; पाच बिल्डर्सविरुद्ध गुन्हा
By admin | Published: July 5, 2016 02:35 AM2016-07-05T02:35:51+5:302016-07-05T02:35:51+5:30
बेसाईटवर खोटी माहिती देऊन फसवणूक करणाऱ्या पाच बिल्डरांविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन बिल्डरांना अटक करण्यात आली
वसई : बेसाईटवर खोटी माहिती देऊन फसवणूक करणाऱ्या पाच बिल्डरांविरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन बिल्डरांना अटक करण्यात आली असून त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत.
नालासोपारा शहरात माहेश्वरी बिल्डरने आठ इमारतींचा प्रकल्प उभारला जात असल्याची माहिती बेवसाईटवर दिली होती.
मीरा रोड येथे राहणाऱ्या गीता पवार यांनी ही जाहिरात पाहून याठिकाणी एक सदनिका विकत घेतली होती. त्याबदल्यात पवार यांनी साडे अकरा लाख रुपये बिल्डरला दिले होते. दोन वर्षे झाली तरी ताबा देत नसल्याने पवार यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
तक्रार केल्यानंतर झालेल्या चौकशीत माहेश्वरी बिल्डरने बनावट परवाना, सातबारा उतारा तसेच बिगरशेती दाखला तयार करून बांधकाम केल्याचे उजेडात आले. त्यानंतर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.
यातील दोन बिल्डर फरार झाले आहेत. यामुळे अशा प्रकारचे गोरखधंदे करणाऱ्या बिल्डर आणि बांधकाम व्यावसायिकात घबराट माजली आहे. तर असे आणखी काही बिल्डर पोलिसांच्या रडावर असल्याचे समजते.