ग्राहकांची फसवणूक केली, बिल्डरला अटक; २१ जणांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 03:03 AM2018-06-06T03:03:28+5:302018-06-06T03:03:28+5:30
टेम्भोडे येथील महेंद्र पाटील ह्या बिल्डर ने विविध आमिषे दाखवून ५ कोटी ८५ लाख रु पयांची फसवणूक केल्या प्रकरणी पालघर पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्यांची रवानगी ठाणे कारागृहात केली.
पालघर : टेम्भोडे येथील महेंद्र पाटील ह्या बिल्डर ने विविध आमिषे दाखवून ५ कोटी ८५ लाख रु पयांची फसवणूक केल्या प्रकरणी पालघर पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने त्यांची रवानगी ठाणे कारागृहात केली.
आरोपीच्या मालकीची मौजे टेम्भोडे येथे जमीन असून तिच्यावर ओरिएंटल इंटरप्रायजेस या नावाने कंपनी उघडली. या जमिनीवर १७ बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनचे काम सुरू करून स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देतो अशा जाहिराती त्यांनी विविध ठिकाणी प्रदर्शित केल्या. एक ठराविक मुदतीत २ लाख ५० हजार रु पयांची रक्कम भरल्यास त्यांना ६५० रुपये स्क्वेअर फूट दरा प्रमाणे फ्लॅट बुक करून उर्विरत रक्कम हप्त्याने किंवा कर्ज काढून भरावी व ती मुदत संपल्या नंतर बुकिंग केल्यास अशा ग्राहकांना ८५० रु पये तर उशिराने बुकिंग केलेल्या ग्राहकांना ९०० रु पये स्क्वेअर फूटचा भाव देण्याच्या स्कीमच्या जाहिराती लावल्या. त्यांना भुलून फिर्यादी हरेश्वर लखू पागधरे रा.खारेकुरण आदी २१ लोकांनी फ्लॅट बुकिंग केले. बुकिंग, रजिस्ट्रेशन व इतर खर्च असे एकूण १ कोटी १६ लाख ८४ हजार १५० रु पये धनादेश आणि रोखीने घेतले. त्या रक्कमे च्या पावत्या, व प्रॉमेसरी नोट तक्रारदाराना दिल्यानंतर फ्लॅटचा ताबा अथवा फ्लॅटचे रजिस्ट्रेशनची मागणी केली असता आरोपीकडून टाळाटाळ झाल्याने शेवटी फिर्यादी आणि अन्य २१ तक्रारदारांनी धर्मेंद्र भट्ट यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शना नुसार पालघर पोलीस स्टेशन मध्ये तक्र ार दाखल करण्यात आली.आरोपी विरोधात एमपीआयडी कलम ३ सह महाराष्ट्र आॅनरशीप फ्लॅट अॅक्ट कलाम ३,४ व ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.