सायकलिंगमध्ये कमलेश दुबळा प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 11:05 PM2018-08-20T23:05:25+5:302018-08-20T23:05:51+5:30

५० कि.मी. पार केले एक तास ५९ मिनिटे, ४८ सेकंदांत

In the cycling Kamlesh weakens first | सायकलिंगमध्ये कमलेश दुबळा प्रथम

सायकलिंगमध्ये कमलेश दुबळा प्रथम

Next

- अनिरुद्ध पाटील

बोर्डी : राईड फॉर हेल्थ ही औरंगाबाद येथे रविवारी पार पडलेली ५० कि.मी.च्या स्पर्धेत डहाणूतील कमलेश रामू दुबळा या आदिवासी विद्यार्थ्याने पहिला क्रमांक पटकावला. हे अंतर त्याने १ तास, ५९ मिनिटं आणि ४८ सेकंदात पूर्ण केले. परतीच्या प्रवासात रस्ता चुकल्याने, काही वेळ वाया गेल्याची खंत त्याने लोकमतकडे व्यक्त केली.
इंटरनेटवर या स्पर्धेची माहिती पाहून त्याने १० आॅगस्ट रोजी रजिस्ट्रेशन केले. त्यानंतर एसटीच्या टपावर सायकल ठेऊन औरंगाबाद गाठून स्पर्धेत भाग घेतला. तो सरावली माणफोडपाडा येथील रहिवासी आहे.तर पालघरच्या दांडेकर महाविद्यालयात बीएच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. आई-वडील मजुरी करतात, तो ही कॉलेज सुटल्यावर अर्धवेळ कामाला जातो. एवढे करूनही तो ५० किमी सायकलिंगचा सराव नेमाने करतो. शिक्षण व मजुरी ही तारेवरची कसरत करताना काही वेळा सराव चुकतोही, मात्र आठवड्यातून चार दिवस सरावाला प्राधान्य मी देतो असेही तो म्हणाला. आर्थिक स्थितीमुळे महागातली सायकल घेता आलेली नाही. यावर तोडगा म्हणून गाठीला पैसे जमल्यावर, वेगवेगळे सुटे भाग खरेदी करून सायकलच मॉडीफाय केली आहे असे त्याने सांगितले.
मला परिस्थितीचे दुखणे उगाळत बसण्यात स्वारस्य नाही. आहाराचे नियमही पाळता येत नाहीत असे तो म्हणाला. केवळ छंद आणि जिद्दीच्या जोरावर परिस्थितीवर मात करायचे कसब तो शिकला आहे. २०१४ साली त्याने सरावाला प्रारंभ केला. परंतु काही वर्ष आजारपणामुळे स्पर्धांना मुकावे लागले.
तरीही आजपर्यंत अहमदाबाद, नाशिक, पालघर येथील स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्याने बक्षिसेही मिळवली आहेत. आजतागायतच्या यशात महाविद्यालायकडून प्रोत्साहन मिळाले, हे सांगायला मात्र तो विसरला नाही.

चुरस खूप होती
राईड फॉर हेल्थ ही सायकलिंग स्पर्धा, रविवार १९ आॅगस्ट रोजी औरंगाबाद येथे पार पडली.
स्पर्धेच्या ५० किमी अंतराच्या गटात अत्यंत प्रखर अशी चुरस होती. तरीही कमलेशने
पहिला क्र मांक पटकावला.

Web Title: In the cycling Kamlesh weakens first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.