Cyclone Nisarga: डहाणूत वादळसदृश्य स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 01:59 PM2020-06-03T13:59:15+5:302020-06-03T13:59:24+5:30
डहाणू गाव, नरपड आणि चिखले या किनारी गावांना संभाव्य धोका पोहचू शकतो अशी शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
- अनिरुद्ध पाटील
डहाणू: समुद्रकिनारी चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता डहाणू तालुक्यातील सुमारे 33 किमी लांबीच्या किनाऱ्यावर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. या तालुक्यातील न्यायालय परिसरालगतचा सतीपाडा, डहाणू गाव, नरपड आणि चिखले या किनारी गावांना संभाव्य धोका पोहचू शकतो अशी शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान 1 जून पासून तालुक्यात एनडीआरएफचे पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी किनारी भागाची पाहणी केल्यानंतर या पथका प्रमाणेच, महसूल, पोलीस विभागाचे कर्मचारी तैनात केले आहेत.
सकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस होता. बुधवारी दुपारी साडेबारानंतर वादळसदृश्य वारे वाहू लागले असले, तरी दीड वाजेपर्यंत हा वेग कमी आहे. त्यामुळे वीज सुरळीत आहे. कालपासूनच काही गावातील कच्या घरातील नागरिकांना लगतच्या शाळांमध्ये निवाऱ्यात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे घरांना टाळे लागली आहेत.