डहाणू दुर्घटना : सारे बळी लोभाचे आणि बेदरकारीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 03:51 AM2018-01-14T03:51:03+5:302018-01-14T03:51:10+5:30

येथे शनिवारी घडलेली ३५ विद्यार्थी समुद्रात बुडण्याची घटना ही लाँच मालकाच्या अतीलोभामुळे व विद्यार्थ्यांच्या बेदरकारीमुळे घडली आहे. यापूर्वी खानवेल येथे धरणात नवी कोरी बोट बुडून अशीच दुर्घटना तर खोचिवडे गावातील भाविक उत्तन येथील धारावी देवीचा नवस फेडण्यासाठी जात असताना खच्चून भरलेली बोट बुडण्याची घटना घडली होती.

Dahanu Accident: All the victims are lobbying and negligent | डहाणू दुर्घटना : सारे बळी लोभाचे आणि बेदरकारीचे

डहाणू दुर्घटना : सारे बळी लोभाचे आणि बेदरकारीचे

Next

डहाणू : येथे शनिवारी घडलेली ३५ विद्यार्थी समुद्रात बुडण्याची घटना ही लाँच मालकाच्या अतीलोभामुळे व विद्यार्थ्यांच्या बेदरकारीमुळे घडली आहे. यापूर्वी खानवेल येथे धरणात नवी कोरी बोट बुडून अशीच दुर्घटना तर खोचिवडे गावातील भाविक उत्तन येथील धारावी देवीचा नवस फेडण्यासाठी जात असताना खच्चून भरलेली बोट बुडण्याची घटना घडली होती. या दोनही घटनांत काहींचा बळीही गेला होता. या घटनांपासून कुणी काहीही धडा शिकले नाही, त्यामुळे आजचीही घटना घडली. त्यामुळे ठराविक काळाने अशा दुर्घटना घडत असतात.
या तीनही घटनांना लाँन्च मालकांचा जास्ती कमाई करण्याचा लोभ व त्यासाठी जास्त प्रवासी भरण्याची हाव तर त्यात बसलेल्या प्रवाशांनी बोटीचा तोल राखण्याबाबत दाखविलेली बेदरकारी हीच कारणे कारणीभूत ठरली होती. सिल्व्हासा येथील एका रिसॉर्टच्या मालकाने आपल्या पर्यटकांना जलसफर घडविण्यासाठी नवी कोरी अत्याधुनिक लाँन्च घेतली होती तिच्यातून सैर करण्यासाठी आपल्या मुंबईच्या मित्र परिवाराला खास आमंत्रीत केले होते. स्वत: तिचे मालक यावेळी त्यांच्या सोबत होते.
तरीही त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने असलेले प्रवासी संख्येचे बंधन झुगारले व त्याची किंमत बोटीतील काहींना आपल्या प्राणाचे मोल देऊन मोजावी लागली.
खोचिवडे-उत्तन समुद्रातील घटनाही अशीच होती तिथे लाँन्च नव्हत्याच त्यामुळे गावातीलच होडीवाला स्थानिक प्रवाशांची छोट्या अंतरासाठी ने-आण करायचा मुळात ही बोट प्रवासी वाहतूकीसाठी नव्हतीच तरीही ती त्यासाठी वापरली गेली. ते करतांनाही प्रवासीसंख्येचे बंधन पाळले नाही. मिळतील तेवढे भाविक भरले गेले. त्यातून अनर्थ घडला आणि यात्रेचे रूपांतर सुतकी परिवारात झाले.
शनिवारच्या घटनेतही असेच घडले. या किनाºयावर ही बोट तीन चार दिवसांपूर्वीच समुद्रातली जवळच्या अंतरावरील ट्रीप घडविण्यासाठी आणली गेली होती. समुद्र उथळ असल्याने ती किनाºयापर्यंत आणता येत नव्हती त्यामुळे ती ३० ते ४० मीटर खोल नांगरून ठेवली जात होती. बोटीतून प्रवासी अथवा पर्यटक तिच्यापर्यंत नेले जात होते. याही वेळी प्रवासी संख्येचे बंधन आणि बोटीचा तोल सांभाळण्याचा नियम पाळला गेला नाही त्यातून हा अनर्थ घडला.

अशी घडली दुर्घटना झाला आक्रोश
या दुर्घटनेतून बचावलेल्या एका विद्यार्थीनीने सांगितले की, शुक्रवारी सकाळी आम्ही कॉलेज संपल्यावर समुद्राच्या सफरीवर जायचे ठरविले. आमच्याच गृपमधील काही जण आमच्या आधी अशी सैर करून सुखरूप आले होते. त्यामुळे आमचा उत्साह वाढला होता. म्हणून आम्हीही अशा सफरीवर जायचे ठरविले. छोटया होडक्यातून आम्ही लॉन्च पर्यंत गेलो. सगळे बसल्यावर धांगडधिंगा सुरू झाला. कोण काय करतो आहे हे कुणालाच कळत नव्हते.
सेल्फी काढण्याची स्पर्धा सुरू झाली. सगळयांनाच लॉन्चच्या एका बाजूच्या कडेला जाऊन सेल्फी काढायचे होते. तो चांगला येण्यासाठी सगळयांच्या चेहºयावर भरपूर प्रकाश येणे आवश्यक होते त्यामुळे सगळे ग्रुप लॉन्चच्या डाव्या बाजूच्या कडेवर एकवटले त्यामुळे लॉन्चचा तोल गेला. काय होते आहे हे कळण्यापूर्वीच ती कलंडली आणि काही पाण्यात पडले तर बोटीत पाणी शीरू लागताच रडारड आणि आईऽऽ ग च्या किंकाळया सुरु झाल्या.

Web Title: Dahanu Accident: All the victims are lobbying and negligent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.