डहाणू दुर्घटना : स्पीड बोटी होत्या नादुरुस्त, सागरी पोलिसांच्या बोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 01:06 AM2018-01-14T01:06:59+5:302018-01-14T01:07:03+5:30
सागरी पोलिसांच्या स्पीडबोटी, तटरक्षक दलाच्या होड्या आणि मेरीटाईम तसेच प्रशासनाच्या अन्य बोटी मदतीला आल्या नाहीत. त्या पैकी सागरी पोलिसांच्या स्पीडबोटी नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली असून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
डहाणू : सागरी पोलिसांच्या स्पीडबोटी, तटरक्षक दलाच्या होड्या आणि मेरीटाईम तसेच प्रशासनाच्या अन्य बोटी मदतीला आल्या नाहीत. त्या पैकी सागरी पोलिसांच्या स्पीडबोटी नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली असून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तटरक्षक दलाला घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छीमारांची बोट घेउन घटनास्थळ गाठले. त्यानंतर दमण येथून हेलिकॉप्टर मागविण्यात आले. सुमारे सहा तास समुद्रात हेलिकॉप्टरने शोधकार्य हाती घेतल्याने दुसºया हेलिकॉप्टरची मदत घेतल्याचे तटरक्षक दलाच्या डहाणू विभागाचे कामांडन्ट एम. विजयकुमार यांनी दिली.
सतीपाडा समोरील किनाºयावर सुधीर दत्ताराम अक्रे ४७ वय, राहुल ठाकूर, भावेश घाटाल, विठ्ठल लाखात, सुरज लाखात, आनंद दिवेकर, जयेश दिवेकर, सनी वेडगा, मनीष सालकर, शापुर सालकर, विजय दुबळा सलीम रमजान शेख यांच्यासह अन्य मच्छीमार मदतीकरिता गेले गेले होते. विद्यार्थिनींना छोट्या होडीत आणि त्यानंतर मोठ्या बोटीतून किनाºयावर पाठवले.
काही दिवसांपूर्वी सागरी सफरीची सेवा देणारी ही बोट या परिसरात आली कशी? तिच्याकडे आवश्यक तो परवाना आणि सफर करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षात्मक बाबी होत्या का़य याची चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे. जर या बाबी नसतील तर बोटीच्या मालकाविरूध्द आणि चालकाविरूध्द गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
१७ विद्यार्थिनी उपचारानंतर घरी
हेमंत कुमावत, अमन हरजिन, शिवम गुप्ता, उर्वीस शहा, हिमाउद्दीन खान, अरबाज पठाण हे विद्यार्थी सुरक्षित घरी गेल्याची माहिती कनिष्ठ विद्यालयाचे उप प्राचार्य सोपान इंगळे यांनी दिली असून, एकूण तीस विद्यार्थी समुद्रसफरीवर गेल्याचे म्हटले आहे.
तर मोसुदा परवेझ शेख, सोनी मौर्य, हेमल सुरती, बरखा धोडी, आरती सुरती, करिना मायावंशी, टिना मायावंशी, वैशाली मायावंशी,कीर्ती मायावंशी पल्लवी दिंडे, सना खान, जानव्ही वाढीया, ईशा वाढीया, प्रियंका गुप्ता, तेजल माच्छी, सोनल तडवी, डेझी झाईवाला, सपना वाघ, सुमन जयस्वाल, मिसबा मुन्शी, कुरेशी हिना या विद्यार्थिनी बोटीत गेल्या होत्या त्यापैकी हिना वगळता अन्य विद्यार्थिनी आणि बोटचालक महेंद्र अंबिरे यांना डहाणू येथील आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यापैकी या सतरा विद्यार्थिनींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.