डहाणूतील भूकंपाचा केंद्रबिंदू कासाजवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 04:17 AM2019-01-25T04:17:23+5:302019-01-25T04:17:28+5:30

डहाणू आणि तलासरी तालुक्याला गेल्या तीन महिन्यांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत.

Dahanu earthquake center | डहाणूतील भूकंपाचा केंद्रबिंदू कासाजवळ

डहाणूतील भूकंपाचा केंद्रबिंदू कासाजवळ

Next

डहाणू : डहाणू आणि तलासरी तालुक्याला गेल्या तीन महिन्यांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. गुरुवारी सकाळी सव्वानऊ वाजता पुन्हा ३.४ रिश्टर स्केलचा धक्का बसला. त्याचा केंद्रबिंदू कासा, दापचरी व आशागड या त्रिकोणात आहे.
सकाळी ९.१० व ९.१५ वाजता हे धक्के जाणवले. डहाणूच्या जंगलपट्टी भागातील खुबळे, वरखंडा, हळदपाडा, आंबोली, चिंचले, आंबेसरी या भागात दोन जोरदार भूकंपाचे धक्के बसले. हे धक्के जोरात असल्याची माहिती येथील ग्रामस्थ देऊ रामा मोहनकर यांनी दिली. दापचरीनजीकच्या गांगणगाव शाळेतील बैठक व्यवस्था व छतावरील पत्रे हलले. शिवाय तलासरी तालुक्यातील वसा या गावात दुपारी १२.३६ वाजताच्या सुमारास आणखी हादरा बसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दरम्यान २० जानेवारी २०१८ रोजी ३.६ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता. त्या भूकंपाचा केंद्रबिंदू १२ किलोमीटर खोल होता. किनाऱ्यालगतच्या गावात तो स्थानिकांनी अनुभवला होता. त्यामुळे समुद्रात हादरे बसल्यास लाटांची उंची वाढून धोका संभवू शकतो, अशी भीती स्थानिक व्यक्त करीत आहेत.
>शास्त्रज्ञ रवाना
शास्त्रज्ञांचे एक पथक डहाणूकडे येण्यासाठी निघाले असून ते तीन दिवस या परिसरात मुक्काम करून अहवाल सादर करणार आहेत.
- प्रताप राठोड,
निवासी नायब तहसीलदार

Web Title: Dahanu earthquake center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.