डहाणूत हॉवरक्राफ्ट कोस्ट उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 10:24 PM2018-11-02T22:24:12+5:302018-11-02T22:25:12+5:30
मच्छीमार, स्थानिकांत समाधान; जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेला मिळणार नवा आयाम
बोर्डी : भारतीय तटरक्षक दलाच्या मुंबई कोस्टहून आलेल्या हॉवरक्र ाफ्टने शुक्र वारी पालघरच्या समुद्रात गस्त घातली. दरम्यान येथील फोर्ट नजीकच्या खाडीत लवकरच ‘हॉवरक्राफ्ट कोस्ट’ उभारले जाणार आहे. या बाबतचा प्रस्ताव पालघर जिल्हयाधिकाराऱ्यांकडे पाठविण्यात आल्याची माहिती कमांडंट एम. विजयकुमार यांनी लोकमतशी बोलताना दिली. हे ठाणं निर्माण झाल्यास सागरी सुरक्षा अभेद्य होईल. त्यामुळे स्थानिक मच्छीमार, किनाºयालगतचे नागरिक आणि सागरी पोलिसांनाही त्याचा फायदा होणार आहे.
या तालुक्यातील चिखले गावात भारतीय तटरक्षक दलातर्फे २२ मार्च २०१२ रोजी वीस एकर क्षेत्रावर प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यानंतर १९ जानेवारी २०१५ रोजी पहिल्यांदाच हॉवरक्र ाफ्ट दाखल झाली होती. शुक्र वारी पुन्हा एकदा मुंबई कोस्टहून ही बोट दुपारी साडेअकराच्या सुमारास महाराष्ट्र-गुजरात सीमेलगतच्या समुद्रात गस्त घालताना दिसली.
डहाणू फोर्टलगत खाडीनजीक तटरक्षक दलाचे कार्यालय असून येथे हॉवरक्राफ्ट कोस्ट उभारले जाणार आहे. या बाबतचा प्रस्ताव पालघर जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आलेला आहे.
- एम. विजयकुमार, कमांडंट,
भारतीय तटरक्षक दल