डहाणू जनता बँकेत प्रगती पॅनल विजयी
By Admin | Published: June 7, 2016 07:43 AM2016-06-07T07:43:06+5:302016-06-07T07:43:06+5:30
दि डहाणू रोड जनता सहकारी बँकेच्या निवडणूकीत प्रगती पॅनलने सत्ताधारी पँनलवर मात करुन एकहाती सत्ता मिळाली आहे.
डहाणू : दि डहाणू रोड जनता सहकारी बँकेच्या निवडणूकीत प्रगती पॅनलने सत्ताधारी पँनलवर मात करुन एकहाती सत्ता मिळाली आहे.
एकुण १५ जागांपैकी प्रगती पँनलने एक जागा बिनविरोध जिंकलेली आहे. त्यामुळे १४ जागाांसाठी एकूण २८ उमेदवार रिंगणात होते. डहाणूच्या विकासात सिंहाचा वाटा असलेल्या या बँकेला ७५ वर्षाची परंपरा लाभली असल्याने दोन्ही पँनलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
प्रगती पँनलच्या राजेश पारेख , मिहीर शहा , अॅड. रमेश नहार ,भावेश देसाई , राजकुमार नागशेट , प्रदिप चाफेकर , सईद शेख , गौरीशंकर रामनरेश सिंग , संजय कर्णावट , प्रितेश सूर्यकांत शाह , शैलेश बारी , वैशाली आशिष बोथरा , राधिका सुनिल पोंदा हेमंत ठकसेन तामोरे संजय धोडी (बिनविरोध) यांनी विजय मिळविला. आमदार आनंद ठाकूर , शमी पिरा,करण ठाकूर, डहाणूतील बागायतदार, बडे व्यवसायिक यांनी यावेळी विजयी उमेदवारांचे स्वागत केले.
मागील १५ वर्षे भरत राजपूत यांचे डहाणू रोड जनता बँकेवर निर्विवाद वर्चस्व होते.त्यामुळे त्यांच्या संपूर्ण पॅनलचा पाडाव. हा त्यांना मोठा धक्का आहे. प्रगती पॅनलच्या विजयी उमेदवारांची डहाणू शहरातून मिरवणूक काढण्यात आली. (वार्ताहर)