डहाणू जव्हारला आज मतदान; पोलीस, सुरक्षा दले, सीसी कॅमेरे तैनात, पोलिसांचे व जवानांचे संचलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 03:35 AM2017-12-17T03:35:50+5:302017-12-17T03:36:00+5:30
जव्हार नगरपरिषदेच्या प्रचार सभांच्या तोफा शनिवारी शांत झाल्या असून आता मतदान आणि मतमोजणीची तयारी सुरू झाली आहे. रविवारी मतदान होणार आहे यासाठी निवडणूक निर्णय अधिकाºयांसह सर्व फौजफाटा सजग झाला असून यंदा मतदानाही टक्केवारी वाढण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
- हुसेन मेमन
जव्हार : जव्हार नगरपरिषदेच्या प्रचार सभांच्या तोफा शनिवारी शांत झाल्या असून आता मतदान आणि मतमोजणीची तयारी सुरू झाली आहे. रविवारी मतदान होणार आहे यासाठी निवडणूक निर्णय अधिकाºयांसह सर्व फौजफाटा सजग झाला असून यंदा मतदानाही टक्केवारी वाढण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
मतदानासाठी १५ केंद्राची उभारणी करण्यात आली असून यासाठी ६ क्षेत्रिय अधिकारी, पीआरओ म्हणून २०, पीओ २० , २० शिपाई आणि २० पोलिस यांची नेमणूक करण्यात आली आहे एकूण ६० मतदान यंत्रे, ६० पेपरसील व्हीडीओ सर्व्हालन्स ०२ तर भरारी पथक २ अशी यंत्रणा तैनात आहे. तर शुक्रवार पासूनच जव्हारमधील प्रत्येक प्रभाग आणि शहरात पोलिस संचलनही करण्यात आले आहे.
शुक्रवारी सायंकाळी पासून जाहिर प्रचार बंद झाला असला तरी छुपा प्रचार मात्र सुरु च राहणार आहे. यावेळचे मातब्बर उमेदवार पाहता लक्ष्मी दर्शनाचा योगही मतदारांच्या नशिबात असल्याचे चित्र असून यावर अंकुश ठेवण्याचे मोठे आव्हान निवडणूक प्रक्रिया राबविणाºया यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. ते ती कसे पार पाडते? हे आता रविवारी स्पष्ट होईलच.
या तर चोरांच्या उलट्या बोंबा -आमदार आनंद ठाकूर
डहाणू : आम्ही डहाणूचा विकास केला आहे. डहाणू रोड जनता बँकेत भ्रष्टाचार तुम्ही केला आहे. आणि भाजपचे नेते राष्ट्रवादीवर आरोप करतात .हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आनंद ठाकूर यांनी प्रचार रॅलीत हाणला. मतदान काही तासांवर येताच आमदार आनंद ठाकूर आक्र मक झाल्याने भाजपच्या गोटात चिंता आहे.
यावेळी विजयाचा गुलाल राष्ट्रवादीच उडवणार आहे असा दावा तालुका प्रमुख राजेश पारेख यांनी केले.यावेळी युवा नेते करण ठाकूर ,रमेश कर्नावट तसेच सर्व प्रभागातील कार्यकर्ते आणी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डहाणू गाव, मसोली, वडकुन, ईराणी रोड, आगर , सागरनाका, लोणीपाडा, सरावली, पटेलपाडा, या भागात राष्ट्रवादीने शनिवारी भव्य रॅली काढुन शक्ती प्रदर्शन केले. रविवारी डहाणूत मतदान होणार आहे. सेना, भाजपचे मंत्री, सर्वच पक्षांचे खासदार, आमदार यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे निवडणुकीला रंगत आली आहे. आरोप-प्रत्यारोपांनी प्रचारही चांगलाच गाजला आहे.
डहाणूत सेनेची प्रचार रॅली
डहाणू : शनिवारी शिवसेनेने रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. डहाणूचा गड शिवसेना राखेल, असा विश्वास आमदार व पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांनी रॅलीत व्यक्त केला.
यावेळी आ. अमित घोडा, केतन पाटील, नगराध्यक्षपदाचे उमेद्वार संतोष शेट्टी यांच्यासह नगरसेवकपदाच्या २५ उमेदवारांसह डहाणूतील सर्व प्रभागात रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. या रॅलीत मोठ्या संख्येने महिला व तरूणांचा समावेश होता.