डहाणू-नाशिक ट्रेनची गरज असताना बुलेट ट्रेन कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:02 AM2018-05-25T00:02:08+5:302018-05-25T00:02:08+5:30

उद्धव ठाकरे यांचा सवाल : वनगांच्या कुटुंबाला भाजपाने वाऱ्यावर सोडले

Dahanu-Nashik train needs bullet train when needed? | डहाणू-नाशिक ट्रेनची गरज असताना बुलेट ट्रेन कशासाठी?

डहाणू-नाशिक ट्रेनची गरज असताना बुलेट ट्रेन कशासाठी?

Next

विक्रमगड : पालघर जिल्ह्यातील आदिवासींचा विकास करणाºया कल्याण-डहाणू-नाशिक रेल्वेची गरज असताना बुलेट ट्रेनचा हट्ट कशासाठी, असा संतप्त सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथील प्रचारसभेत केला.
ज्या चिंतामण वनगा यांनी आयुष्यभर निष्ठेने भाजपा वाढविण्याचे काम केले, पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपा वाढवली त्या वनगांच्या कुटुंबाला भाजपाने वाºयावर सोडले. त्यामुळे त्यांच्या अश्रूंना न्याय देण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. आम्ही कुणाच्याही पाठीत वार केला नाही. भाजपाने वनगांच्या कुटुंबीयांपैकी कोणालाही तिकीट दिले असते तर आज मी युतीच्या प्रचारासाठी विक्रमगडमध्ये आलो असतो आणि तिला मोठ्या फरकाने निवडूनही आणले असते. त्यामुळे शिवसेनेवर कुणी बिनबुडाचे आरोप करू नये, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला.
या वेळी बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार राजन विचारे, आमदार शांताराम मोरे, उदय सावंत, उपजिल्हाप्रमुख राजाभाई जाधव, तालुकाप्रमुख सागर आळशी, उपतालुकाप्रमुख प्रमोद आळशी यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेत भाजपा आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

फाफडा खायला गुजरातला जायचे आहे का?
फाफडा खायला तुम्हाला गुजरातला जायचे आहे का... त्यापेक्षा आपली झुणका भाकर चांगली असेही ते म्हणाले. कर्नाटकच्या राजकारणाला हात घालत राज्यपालांवर तोफ डागत वाल्याचा वाल्मिकी झालाच नाही, असा उपरोधिक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी कर्नाटकच्या राज्यपालांना लगावला.

Web Title: Dahanu-Nashik train needs bullet train when needed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.