डहाणू न.पं. निवडणुकीत भरला रंग, बोलबच्चन मतदारांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:26 AM2017-12-09T00:26:16+5:302017-12-09T00:26:24+5:30

डहाणू नगर परिषद निवडणूक १३ डिसेंबर रोजी होणार असून सर्वच वॉर्डात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली आहे. मात्र नगर परीषद अस्तित्वात येऊन तीस वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही जनतेला

Dahanu N.P. The color of the election, the ballad crane on the radars of the voters | डहाणू न.पं. निवडणुकीत भरला रंग, बोलबच्चन मतदारांच्या रडारवर

डहाणू न.पं. निवडणुकीत भरला रंग, बोलबच्चन मतदारांच्या रडारवर

Next

शौकत शेख/अनिरु द्ध पाटील
डहाणू : डहाणू नगर परिषद निवडणूक १३ डिसेंबर रोजी होणार असून सर्वच वॉर्डात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली आहे. मात्र नगर परीषद अस्तित्वात येऊन तीस वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही जनतेला केवळ विकासकामांचे गाजर दाखविण्यात आले आहे. त्यामुळे या वेळी योग्य उमेदवार निवडून देऊ असे मतदारांचे म्हणणे आहे.
तीस वर्षाच्या काळात शहराने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. या निवडणुकीत शिक्षित मतदारांची संख्या अनेक पटीने वाढली असून उच्च शिक्षितांच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. त्या मध्ये स्वतंत्र विचार करणाºया शिक्षित महिलांचा टक्का ट्रम्पकार्ड सिद्ध होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक पूर्व अपेक्षित जागांचे भाकीत करणे जिकिरीचे बनले आहे. विविध वॉर्डामध्ये फिरून आश्वासनांची खैरात करणार्या पक्षांना सजग मतदारांकडूनच भविष्यातील नियोजित शहराच्या विकासाबद्दलचा रोडमॅप ऐकविला जातो आहे. तर दुसरीकडे पावणेतीन कोटी रुपये खर्चून आगर येथे बांधण्यात येत असलेले बालोद्यान तसेच थर्मल पॉवर नजिकचे करोडो रुपये खर्ची घालून बांधलेले मच्छीमार्केट हे शहरापेक्षा दूर असल्याने ही नियोजनशून्य कामे करणारे मतदारांच्या रडारावर आहेत. अनेक उच्चभू वस्त्यांमध्ये सुस्थितीत असणार्या डांबरी रस्त्यांचे काँक्रीटीकरण तसेच काँक्रिटच्या रस्त्याल ा मुद्दाम मुलामा देऊन डागडुजी करून विकासाच्या नावावर नाहक उधळपट्टी करणाºयांना या निवडणुकीत मतदार धडा शिकवतील.
आपल्या पारड्यात अधिक मते मिळवून २५ पैकी जातीतजास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षांना मतदारांची मते मिळविण्यासाठी प्रभावी फंडा वापरावा लागणार आहे. तर स्पष्ट बहुमत कोणत्याच पक्षाला मिळणार नसल्याचा कयास असून अन्य पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा चालल्याने निवडणुकीला रंग भरला आहे.

Web Title: Dahanu N.P. The color of the election, the ballad crane on the radars of the voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.