डहाणू पं.स.ला गटशिक्षण अधिकारीच नाही, शिक्षण विस्तार अधिकाºयांवर भार, ं विद्यार्थ्यांचे होते आहे मोठे शैक्षणिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 05:47 AM2017-09-15T05:47:37+5:302017-09-15T05:47:45+5:30
डहाणू पंचायत समिती शिक्षण विभागाला हक्काचा गटशिक्षणाधिकारी लाभलेला नाही. त्यामुळे शिक्षण विस्तारअधिकाºयांवर आलटूनपालटून पदभार सोपवला जात आहे. डहाणू तालुक्यात केवळ एकच शिक्षण विस्ताराधिकारी संपूर्ण तालुक्याची जबाबदारी या पुढे सांभाळणार आहे.
- अनिरुद्ध पाटील
बोर्डी : डहाणू पंचायत समिती शिक्षण विभागाला हक्काचा गटशिक्षणाधिकारी लाभलेला नाही. त्यामुळे शिक्षण विस्तारअधिकाºयांवर आलटूनपालटून पदभार सोपवला जात आहे. डहाणू तालुक्यात केवळ एकच शिक्षण विस्ताराधिकारी संपूर्ण तालुक्याची जबाबदारी या पुढे सांभाळणार आहे.
तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे बारा गट आहेत. मात्र महादू पवार, विष्णू रावते आणि अरविंद वाघ हे केवळ तीनच शिक्षण विस्ताराधिकारी कार्यरत आहेत. दरम्यान २० जुलै रोजी ४० हजाराची लाच मागितल्याच्या आरोपा प्रकरणी गटशिक्षणाधिकारी अनिल सोनार (श्रेणी २ ) यांच्यावर तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी निलंबनाची कारवाई केली. या घटनेला आठवडाभराने दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होईल. मात्र ही जागा भरण्यात आलेली नाही. शिवाय आजही डहाणू गटविकास अधिकाºयांच्या दालनाबाहेर सोनार यांच्याच नावाची पाटी लागलेली आहे. त्यामुळे एकूणच डहाणू पंचायत समिती प्रशासनावर सोनार यांचे किती वर्चस्व होते याची प्रचिती येते.
सोनार यांच्या जागी विस्तारअधिकारी महादू पवार यांना प्रभारी पद देण्यात आले. विस्तार अधिकारी पदासह दुहेरी कसरत करीत असताना पवार हे महिन्याभरासाठी रजेवर गेले आहेत. त्यांच्या जागी विष्णू रावते यांची वर्णी लावण्याचे फर्मान जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी काढल्यानंतर रावते यांनी गुरु वार १४ सप्टेंबर रोजी प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदाचा भार स्वीकारला आहे. सदर जबाबदारी पहिल्यांदाच स्वीकारत आहेत. परंतु वाघ या केवळ एकाच विस्तारअधिकाºयावर संपूर्ण तालुक्याचा भार येणारे आहे. त्यामुळे तालुका आणि जिल्हा प्रशासन पुरोगामी महाराष्ट्राला कोणता आदर्श घालून देत आहेत.
आज डहाणू तालुका हा प्रभारी तसेच अतिरिक्त भार स्वीकारलेल्या गट विकास आणि गट शिक्षणाधिकारी यांच्या बळावर कसा विकास साधणार या कडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे विरोधी पक्ष सक्षम नसल्याने हे घडत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. या स्थितीमुळे विद्यार्थ्यांचे मात्र फार मोठे शैक्षणिक नुकसान होते आहे. शिक्षकांची वानवा, पायाभूत सुविधांचा अभाव अशा स्थितीत आता प्रशासकीय अधिकाºयांच्या टंचाईची भर त्यात पडली आहे.
पदाधिका-यांकडे लक्ष
या बाबत शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष आणि डहाणू पंचायत समिती सभापती लोकमतच्या वृत्तानंतर ही समस्या सोडवतील का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.