डहाणू, तलासरीला पुन्हा ३.१ रिश्टर स्केलचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 02:42 AM2019-02-14T02:42:50+5:302019-02-14T02:43:00+5:30
भूकंपाच्या धक्क्यांमुळे दहशतीखाली असणारे डहाणू, तलासरीतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच बुधवारी पुन्हा धक्का हादरे बसले.
डहाणू : भूकंपाच्या धक्क्यांमुळे दहशतीखाली असणारे डहाणू, तलासरीतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच बुधवारी पुन्हा धक्का हादरे बसले.
तालुक्यातील धुंदलवाडी आणि तलासरी परिसरात सकाळी १०:४४ वाजता ३.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. शासनाकडून राज्य राखीव दलाची १४ जवानांची तुकडी तातडीने दाखल झाली दोन्ही तालुक्यांना मागील तीन महिन्यांपासून भूकंपाचे आजवर ७० धक्के बसले आहेत.
परिणामी शाळाही उघड्यावर भरत आहेत. तसेच कडाक्याच्या थंडीत गावकरी मोकळ्या मैदानात झोपत आहेत. एन.डी.आर.एफ.च्या ३६ जवानांनी येथील गावांमध्ये जाऊन नागरिकांना मार्गदर्शन केले असले तरी दोन तालुक्यांतील गावांसाठी फक्त २०० राहुट्या अपुऱ्या ठरल्या आहेत. दरम्यान, जवान पुण्याला रवाना झाल्याने प्रशासकीय यंत्रणा आजच्या धक्क्यानंतर पांगळी ठरली. शासनाकडून जवानांची तुकडी तातडीने दाखल झाली.
शिंदेना जाणवला धक्का
मंत्री एकनाथ शिंदे, आमदार अमित घोडा हे बुधवारी धुंदलवाडी, हळदपाडा येथील भूकंपग्रस्तांना चादरी, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी आले होते. ते पदाधिकाºयांसह फिरत असताना भूकंप झाला.तो त्यांनाही जाणवला. एकंदर परिस्थिती पाहूून शिंदे यांनी जनतेला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत.