भाजप-शिवसेना युतीच्या विजयात डहाणू राहिले ‘मागे’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 02:41 AM2019-05-29T02:41:17+5:302019-05-29T02:41:35+5:30
पालघर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे राजेंद्र गावीत निवडून आले आहेत.
- अनिरुद्ध पाटील
पालघर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे राजेंद्र गावीत निवडून आले आहेत. मात्र डहाणू विधानसभा मतदार संघात त्यांना अपेक्षे प्रमाणे मतदान झालेले नाही. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर आपला हा पारंपरिक मतदारसंघ राखण्याच्या दृष्टीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केलेली खेळी ही आगामी विधानसभेची जागा काबीज करण्याची रणनीती असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या निकालावरून त्यांचे फासे यशस्वी झाल्याची सध्याची स्थिती आहे. मतदारसंघ पुनरचनेनुसार डहाणू आणि तलासरी तालुक्यांचा समावेश डहाणू विधानसभा मतदारसंघात (अज १२८) झाल्यानंतर २००९ साली विधानसभेच्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बाजी मारली . त्यानंतर २०१४ साली पहिल्यांदाच मोदी लाटेच्या प्रभावाने पास्कल धनारे आमदार झाले. मात्र आपला पारंपरिक बालेकिल्ला हातून निसटल्याची सल माकपला होती. सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा हा गड राखण्याची संधी माकपला चालून आली. त्यांनी महाघाडीत सहभागी होतांना आगामी विधानसभा निवडणुकीत डहाणूच्या जागेकरिता सांघिक सहकार्याचा प्रस्ताव ठेऊन सहभाग घेतला. २३ मे रोजी लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याचे विधानसभानिहाय विश्लेषण पाहता, मात्र डहाणू शहर आणि किनारपट्टी गावे याला अपवाद आहेत. तर या मतदारसंघात नोटाचा पर्याय अधिक वापरला गेल्याचेही दिसून येते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता माकपने केलेली खेळी यशस्वी ठरल्याचे सध्याचे चित्र आहे.
>विधानसभेवर काय परिणाम?
डहाणू विधानसभेत भाजपचा आमदार असतांना युती पेक्षा महाआघाडीला अधिक मतं मिळाली. विजयी उमेदवार राजेंद्र गावीत यांना ७२,१३९ तर महाआघाडीचे बळीराम जाधव यांना ८०,२८६ इतके मतदान झाले. येथे बूथनुसार मतदान पाहता बहुतेक ठिकाणी आघाडच आघाडीवर आहे. वरचष्मा दिसतो. कारण भविष्याचा वेध घेत माकपच्या मतदारांनी दिलेले योगदान अधिक आहे़