महावितरणच्या कारभाराने डहाणू तालुका त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 05:22 AM2018-05-14T05:22:38+5:302018-05-14T05:22:38+5:30
या शहरासह पश्चिम किनारपट्टीवरील गावांत तसेच खेडोपाडयात गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने होणारा वीजेचा लपंडाव, भार नियमनामुळे येथील ग्रामस्थ कमालीचे वैतागले असून
डहाणू : या शहरासह पश्चिम किनारपट्टीवरील गावांत तसेच खेडोपाडयात गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने होणारा वीजेचा लपंडाव, भार नियमनामुळे येथील ग्रामस्थ कमालीचे वैतागले असून दुप्पट, तिप्पट वीजेचे बील भरूनही महावितरणाच्या कारभारात काहीच सुधारणा होत नसल्याने येथील ग्रामस्थामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे येथील चिंचणी, वरोर, वानगांव, फिडर अंतर्गत येणाऱ्या पन्नास ते साठ गावांत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणाकडून कोणतीही उपाय योजना केली जात नसलयाने येथील लघु उद्योजक, डायमेकर्स, कारखानदार तसेच वीजेवर अवलंबून असलेले लहान मोठे दुकानदार, व्यावसायिकांना लाखोचे नुकसान सहन करावे लागते आहे.
एका बाजूला पालघर लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतांनाच दुसºया बाजूला महावितरणने येथील गाव, शहरे, खेडोपाडे अंधारात ठेवली आहेत. ज्यामुळे नागरिकांत प्रचंड चिड व्यक्त केली जात आहे. बोईसर येथील १३२ के.व्ही. स्टेशनमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने येथील लोकांना वीजेसाठी पाच, सहा, तास वाट पहावी लागत आहे. शनिवारी बोईसर येथील झम्पर गेल्याने चिंचणी येथून काही वायरमनने तेथे जाऊन दुरूस्ती केली त्यानंतर येथील ट्रान्सफार्मर नादुरूस्त झाला. त्यानंतर पास्थळ येथे तारा तुटल्याने अपूºया कर्मचाºयांमुळे वीजपुरवठा सुरु करण्यास सहा तास लागले. परिणामी सुमारे पन्नास ते साठ गावांतील धंदा-व्यवसाय ठप्प झाला होता.