परेच्या डहाणू-वैतरणा प्रवाशांसाठी मनसे मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:00 AM2018-04-20T00:00:01+5:302018-04-20T00:00:01+5:30
डहाणू-वैतरणा दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखणाºया रेल्वे प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णया विरोधात लोकमतने लिहिलेल्या वृत्ताची दखल महाराष्ट्र नविनर्माण सेनेने घेतली असून या आदेशा विरोधात शुक्र वारी पालघर रेल्वे अधिक्षक कार्यालयाला जाब विचारण्यात येणार आहे.
पालघर : डहाणू-वैतरणा दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखणाºया रेल्वे प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णया विरोधात लोकमतने लिहिलेल्या वृत्ताची दखल महाराष्ट्र नविनर्माण सेनेने घेतली असून या आदेशा विरोधात शुक्र वारी पालघर रेल्वे अधिक्षक कार्यालयाला जाब विचारण्यात येणार आहे.
डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या दैनंदिन प्रवास करणाºया रेल्वे प्रवाश्यांना लांब पल्ल्याच्या गाड्याच्या आरक्षित डब्यातून प्रवास नाकारण्या बरोबरच त्यांच्या मासिक पास वर ‘आरक्षित शयनयान डिब्बो मे यात्रा की अनुमती नहीं है’ असा शिक्का मारण्याला रेल्वे प्रशासना कडून सुरु वात करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून येथील प्रवासी गाड्यांची संख्या कमी असल्याने आरक्षित डब्यातून प्रवास करीत आला आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने डहाणू पर्यंतच्या प्रवाश्यांसाठी १७ लोकल फेºया, १ पनवेल मेमो, १ दिवा मेमो, १ सुरत मेमो एवढ्या मर्यादित फेºयांची सेवा दिल्याने दररोज सुमारे दिड लाख प्रवाश्यांसाठी या फेºया कमी पडतात. त्यामध्ये वाढ करणे, लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देणे या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने नाईलाजाने प्रवाश्यांना आरक्षित डब्यातून प्रवास करावा लागत होता. लोकमतने गुरुवारच्या अंकात तसे वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल महाराष्ट्र नविनर्माण सेनेने घेतली आहे.
प्रवाशांची बाजू मांडणार
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा जाब विचारण्यासाठी शुक्र वारी माजी जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहर अध्यक्ष सुनील राऊत आदी पदाधिकारी पालघर रेल्वे अधीक्षक कोहली यांना जाब विचारण्यासाठी जाणार आहेत. प्रवाशाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करावा यासाठी ते चर्चा करणार असल्याचे शहर अध्यक्ष राऊत यांनी लोकमतला सांगितले.