बीडीओअभावी डहाणुकरांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 02:16 AM2017-08-05T02:16:53+5:302017-08-05T02:16:53+5:30
येथील गटविकास अधिकारी अवचार यांना लाच घेतल्या प्रकरणी निलंबित केल्यानंतर तलासरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहूल धूम यांना डहाणू पंचायत समितीचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला असला तरी येथे पूर्ण वेळ गटविकास अधिकारी नसल्याने
डहाणू: येथील गटविकास अधिकारी अवचार यांना लाच घेतल्या प्रकरणी निलंबित केल्यानंतर तलासरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहूल धूम यांना डहाणू पंचायत समितीचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला असला तरी येथे पूर्ण वेळ गटविकास अधिकारी नसल्याने येथील विविध विभागाच्या अधिकारी कर्मचाºयांवर कुणाचेही नियंत्रण राहिले नसल्याने विविध शासकीय कामांसाठी येणाºया नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत.
साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्यामध्ये ८५ ग्रामपंचायती असून येथील शिक्षण, पाणीपूरवठा, कृषी, बांधकाम, आरोग्य तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच जंगलपट्टी बरोबरच बंदरपट्टी भागांतील गाव, खेडोपाडयात होणाºया विकास कामांसदर्भात पाठपूरावा करण्यासाठी दररोज हजारो ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामविकास कार्यकर्ते येथे येत असतात. परंतु, येथे गेल्या पंधरा दिवसांपासून पूर्णवेळ गटविकास अधिकारी नसल्याने लोकांना हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. डहाणू पंचायत समितीचा पदभार सध्या तलासरीचे गटविकास अधिकारी राहूल धूम यांच्याकडे असल्याने त्यांना दोन्ही तालुक्यात काम पाहावे लागत आहे.