डहाणूतील राष्ट्रवादी फुटली, नगराध्यक्षांसह ४ आजी, २ माजी नगरसेवक भाजपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 03:03 AM2017-11-22T03:03:17+5:302017-11-22T03:03:25+5:30

डहाणू नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रमिला पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून पालघर जिल्हयाचे पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, भाजपाचे प्रदेशाचे बापजी काटोळे यांच्या उपस्थितीत डहाणू येथील भाजपाच्या संपर्क कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात जाहिररित्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

Dahanu's Nationalist Congress Party, Nagar President with 4G, 2 former corporator BJP | डहाणूतील राष्ट्रवादी फुटली, नगराध्यक्षांसह ४ आजी, २ माजी नगरसेवक भाजपात

डहाणूतील राष्ट्रवादी फुटली, नगराध्यक्षांसह ४ आजी, २ माजी नगरसेवक भाजपात

Next

शौकत शेख 
डहाणू : आगामी १३ डिसेंबर रोजी होणा-या डहाणू नगरपरिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाच २० नोव्हेंबर रोजी डहाणू नगर परिषदेच्या नगराध्यक्ष रमिला पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून पालघर जिल्हयाचे पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, भाजपाचे प्रदेशाचे बापजी काटोळे यांच्या उपस्थितीत डहाणू येथील भाजपाच्या संपर्क कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात जाहिररित्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांचयासोबत राष्टÑवादीचे माजी नगराध्यक्ष रमेश काकड, शमी पीरा, रेणुका राकमुथा, तारा बारी, आशा फाटक, या विद्यमान नगरसेवकांबरोबर माजी नगरसेवक शैलश राकमुथा यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. तर ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत बारी यांनी देखील प्रवेश केला असता तरी ते प्रकृती अस्वस्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. या सर्वांनी नगर परिषद सदस्य पदाचा राजीनाम देऊन भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान यापूर्वी आणि सोमवारी अशा एकूण ११ नगरसेवकांनी राजीनामे दिल्याने डहाणू नगरपरिषद बरखास्त होण्याच्या मार्गावर आहे.
पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेल्या डहाणू शहरात ३१ मे १९८५ पासून काँग्रेस आय, शिवसेना, राष्टÑवादी या पक्षांनी सत्ता भोगली आहे. गेल्या ३२ वर्षात डहाणू नगरपरिषदेने शासनाच्या विविध योजनेअंतर्गत आजतागायत शंभर कोटी पेक्षा जास्त निधी खर्च करून विकासाची कामे केली. परंतु ठेकेदार, प्रशासन व काही नगरसेवकांच्या मिलिभगतमुळे असंख्य विकास कामे निकृष्ट झाली व त्यात लाखोंचा भ्रष्टाचार झाला. शिवाय अनेक योजनेत झालेल्या विकास कामांच्या वास्तूचे उपयोग न केल्याने शासनाचे लाखो रूपये पाण्यात गेले. डहाणू नगरपरिषदेच्या विकास कामात होत असलेला भ्रष्टाचाराबाबत डहाणू मतदार संघाचे आमदार पास्कल धनारे यांनी फेब्रुवारी २०१६ ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार करून चौकशीचे आदेश जिल्हाधिकाºयांनी डहाणू उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत प्रत्यक्षात चौकशी करून अहवाल मागवला होता. त्या प्रमाणे विविध योजनेअंतर्गत झालेल्या विकास कामाची सविस्तर चौकशी करून मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करण्यात आला होता. मात्र अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
डहाणू नगरपालिकेवर सध्या राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता होती. राष्टÑवादीकडे एकूण पंधरा नगरसेवक होते. त्यापैकी राष्ट्रवादीच्या अकरा (११) नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या पूर्वीच माजी नगराध्यक्ष मिहीर शाह, प्रकाश माच्छि प्रकाश बुजड तसेच अलका मर्दे यांनी राजीनामे दिले आहेत. तर राष्टÑवादीच्या लीलावती देवा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सध्या राष्टÑवादी पक्षाकडे पंधरा नगरसेवकांपैकी नगरसेवक राजेश पारेख, राजेंद्र माच्छी, प्रदिप चाफेकर किर्ती मेहता असे केवळ चार नगरसेवक असल्याने त्याची अवस्था दयनीय झाली आहे. दरम्यान डहाणू नगरपरिषदेच्या पंचवीस जागांसाठी १२५ इच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने आमची देखील कसोटी असल्याचे पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी जाहिररित्या सांगितले आहे.

Web Title: Dahanu's Nationalist Congress Party, Nagar President with 4G, 2 former corporator BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा