डहाणूतील रस्त्यांची कामे सुरू

By admin | Published: December 22, 2016 05:24 AM2016-12-22T05:24:13+5:302016-12-22T05:24:13+5:30

डहाणू बोर्डी, डहाणू- आंबेसरी, चिंचणी, कासा, चारोटी, वाणगाव, वधना हे प्रमुख जिल्हामार्ग तसेच राज्यमार्गावर पडलेले खड्डे गेल्या

Dahunu road works | डहाणूतील रस्त्यांची कामे सुरू

डहाणूतील रस्त्यांची कामे सुरू

Next

डहाणू : डहाणू बोर्डी, डहाणू- आंबेसरी, चिंचणी, कासा, चारोटी, वाणगाव, वधना हे प्रमुख जिल्हामार्ग तसेच राज्यमार्गावर पडलेले खड्डे गेल्या एक महिन्यात डांबर खडीने भरल्याने डहाणू तालुका खड्डेमुक्त झाल्याचे दिसून येते. त्यातच कार्यकारी अभियंता आर. यु. वसईकर यांनी तालुक्यातील प्रमुख रस्त्याची पाहणी करु न नवीन रस्त्यांना मजुरी दिली आहे.
डहाणू तालुक्यातील अनेक वर्षापासून खड्ड्ेमय झालेल्या धुंदलवाडी ते उधवा या राज्यमार्गाच्या कायम स्वरूपी उपाययोजना म्हणून हायवे ते उधवा मार्गे तब्बल २० कि.मी संपूर्ण जुना रस्ता खोदुन तो नवीन बनवण्यासाठी ३० कोटी रु पये मंजूर करण्यात आल्याची माहिती डहाणू उप अभियंता टी.आर. खैरनार यांनी दिली. या कामाची निविदा प्रक्रि या पूर्ण झाली असून वर्क आॅर्डर मंजुरीच्या प्रक्रि येत असल्याचेही त्यांनी लोकमतला सांगितले.
हायवे ते उधवा मार्गे २० कि.मीच्या राज्यमार्गाची उंची वाढवून रस्त्याची रूंदी ५.३० मीटर म्हणजे तब्बल १८ फूट होणार आहे. त्यामुळे रहदारीचा प्रश्न कायमचा सोडवला जाणार आहे. या दरम्यान ११ मोठे पूल आणि ५९ मोऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे हळदपाडा, धुंदलवाडी, मोडगाव, उधवा दरम्यानच्या रहिवाशांना खराब रस्त्याच्या त्रासातून कायमची सुटका होणार आहे असे, त्यांनी सांगीतले.डहाणू सा.बा.विभाग अंतर्गत हायवे ते उधवा राज्यमार्गावर अवजड वाहतुकीमुळे अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथील रहिवाशी, रुग्ण, विद्यार्थी, वयोवृद्ध यांना प्रवास करण्यासाठी प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी माकपने अनेकवेळा या रस्त्यासाठी आंदोलने केली आहेत. तीही सफल ठरली आहेत.
(वार्ताहर)

Web Title: Dahunu road works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.