आमदार हितेंद्र ठाकुरांना ५ करोडची अब्रुनुकसानीची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 06:59 PM2024-05-17T18:59:10+5:302024-05-17T19:01:37+5:30
पालघरची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर शंभर कोटी रुपये जमा करण्याची जबाबदारी असून ते त्यासाठी हॉटेलमध्ये कॅान्ट्रॅक्टर, अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचा गंभीर आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला होता.
मंगेश कराळे -
नालासोपारा : पालघरची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर शंभर कोटी रुपये जमा करण्याची जबाबदारी असून ते त्यासाठी हॉटेलमध्ये कॅान्ट्रॅक्टर, अधिकाऱ्यांच्या बैठका घेत असल्याचा गंभीर आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला होता. तसेच त्यासाठी त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणीही त्यांनी केली होती.
हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आरोप बेछूट आणि निराधार असून बैठका घेतल्याचे मान्य करुन त्यात वावगे ते काय? हितेंद्र ठाकूर यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत किंवा त्यांनी माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू, असा इशारा भाजपाने पत्रकार परिषद घेऊन दिला होता. त्यानुसार पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी वकीला मार्फत हितेंद्र ठाकूर यांच्यावर ५ कोटी रुपये अब्रुनुकसानीची नोटीस बजावण्यात आली आहे.