दमणगंगा जोडला तीव्र विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:47 AM2018-02-08T02:47:08+5:302018-02-08T02:47:30+5:30
जव्हार मोखाडा तालुक्यातील क्षेत्रातून जाणा-या दमणगंगेचा जोड प्रकल्प हा स्थानिक लोकांच्या भल्यासाठी नसून तो गुजरात आणि इतर भागाच्या विकासासाठी असल्याचा आरोप जव्हार मोखाड्यातील लोकप्रतिनिधीनी केला
- हुसेन मेमन
जव्हार : जव्हार मोखाडा तालुक्यातील क्षेत्रातून जाणा-या दमणगंगेचा जोड प्रकल्प हा स्थानिक लोकांच्या भल्यासाठी नसून तो गुजरात आणि इतर भागाच्या विकासासाठी असल्याचा आरोप जव्हार मोखाड्यातील लोकप्रतिनिधीनी केला असून याबाबतची माहिती देण्यासाठी झालेल्या बैठकीतच अनेक नागरीकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करून याला विरोध केला याबाबत १५ फेब्रुवारी रोजी जव्हार येथे पुन्हा सुनावणी होणार आहे.
दमणगंगा खोºयातील पाणी अडवून ते गुजरात आणि अनेक भागात वळविण्यात येणार असून याबाबत जव्हार मोखाड अशा ज्या ज्या क्षेत्रातून हे पाणी जाणार आहे तिथल्या लोकांना याबाबत माहीती मिळावी यासाठी यावर सुनावणी होवून हरकती मागविण्यात येणार आहेत. यामुळे या प्रकल्पाची माहीती घेण्यासाठी जव्हार मोखाडा तालुक्यातील अनेक लोकप्रतिनिधी बुधवारी उपस्थित राहीले होते. यावेळी साठा जव्हार मोखाडा तालुक्यात अन प्रकल्प मात्र त्यातले पाणी मुंबई, गुजरातकडे वळविणारा असा हा घाट घातला जात असल्याचा आरोप उपस्थितांंनी केला.
यामुळे एकूण पाणीसाठ्याच्या फक्त १४ टक्केच पाणी याभागाला देण्याचा अन बाकी पाणी वळविण्याचाच हेतू या मागे असल्याचे यावेळी नियोजन समितीचे सद्स्य दिनेश भट यांनी सांगितले यामुळे आता सुनावणीच्या वेळी येथील ग्रामपंचायती अन विविध क्षेत्रातील नागरीक लेखी हरकती नोंदविणार आहेत याशिवाय ग्रामपंचायती या विरोधात ठरावही करणार आहेत यामुळे या दमणगंगा नदीजोड प्रकल्पावरून प्रकरण चागलेच तापले आहे.
>हे तर जखमेवर चोळले जाते आहे मीठ
सूर्या प्रकल्पाचे पाणी मुंबई, मीरा भाईंदर वसई, विरारला देण्यावरून आधीच या जिल्ह्यातील वातावरण तापलेले आहे. त्याबाबत जनभावना प्रक्षुब्ध असतांनाच आता जव्हार, मोखाड्यातील पाणीसाठाही गुजरात व मुंबईसाठी पळविण्याचा प्रयत्न या प्रकल्पाद्वारे होत असल्याने त्या विरुद्ध प्रचंड जनक्षोभ उसळण्याची शक्यता आहे. यामुळे त्याबाबत गुप्तता पाळली जात होती.