दामू शिंगडा श्रीमंत तर गहला सर्वात गरीब उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 02:37 AM2018-05-23T02:37:32+5:302018-05-23T02:37:32+5:30

अहो, आश्चर्यम्! : गावितांची संपत्ती वाढली तर वनगांची संपत्ती घटली

Damu Shingada is the richest and most poor candidate of Gahla | दामू शिंगडा श्रीमंत तर गहला सर्वात गरीब उमेदवार

दामू शिंगडा श्रीमंत तर गहला सर्वात गरीब उमेदवार

googlenewsNext

पालघर/नंडोरे : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांपैकी पाच मुख्य उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील खाजगी व कौटुंबिक संपत्तीचे विवरण पाहता दामोदर शिंगडा सगळ्यात श्रीमंत तर मार्क्सवादी उमेदवार किरण गहला हे सगळ्यात गरीब आहेत.
काँग्रेस चे उमेदवार दामोदर शिंगडा ह्यांच्या नावावर ८ कोटी ९६ लाख ८ हजार ७७ रुपये इतकी सर्वाधिक संपत्ती असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार किरण गहला हे सर्वात गरीब उमेदवार ठरले असून त्यांची संपत्ती ९ लाख ७८ हजार ८४ इतकी आहे.
काँग्रेसचे दामू शिंगडा यांची संपत्ती ८ कोटी ९६ लाख ८ हजार ७७ रुपये, भाजपचे राजेंद्र गावित यांची संपत्ती ८ कोटी ७७ लाख ५० हजार ३७९, बविआचे बळीराम जाधव यांची संपत्ती २ कोटी ३३ लाख ९ हजार ३२७ रुपये, श्रीनिवास वनगा यांची संपत्ती ५४ लाख ४९ हजार ३६२ तर सर्वात कमी संपत्ती माकपचे किरण गहला यांची ९ लाख ७८ हजार ८४ इतकी आहे.
या संपत्तीत जंगम, स्थावर मालमत्ता दाखविण्यात आली आहे तर स्थावर मालमत्तेत विविध प्रकारच्या शेती, बिगरशेती आदी जमिनी समाविष्ट असून जंगम मालमतेमध्ये रोख, ठेवी, शेयर्स, अशी गुंतवणूक तसेच दागिने, वाहने आदी बाबींचा अंतर्भाव आहे.
काँग्रेस मधून आता भाजपवासी झाल्याने उमेदवारी मिळविलेले राजेंद्र गावित यांनी २०१६ ला काँग्रेस मधून आमदारकीची पोटनिवडणूक लढवितांना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती ६ कोटी ५३ लाख ३५ हजार ४९३ रु पये इतकी होती. याचा अर्थ गेल्या दोन वर्षात गावित यांची संपत्ती २ कोटी २४ लाख १४ हजार ८८६ रुपयाने वाढली असल्याचे दिसते. गावित हे २०१४ ला आमदार असतांना त्यांची संपत्ती ५ कोटी ३७ लाख २३ हजार ११ रुपये होती. मात्र २०१६ ला त्यांनी भरलेल्या पोटनिवडणुकीच्या अर्जात त्यांची संपत्ती ६ कोटी ५३ लाख ३५ हजार ४९३ इतकी झाली म्हणजेच या दोन वर्षाच्या फरकात त्यांच्या संपत्तीत १ कोटी १६ लाख १२ हजार ३८२ रुपयाची वाढ झाल्याचे दिसते.
बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांनी यापूर्वी २०१४ ला लढविलेल्या खासदारकीच्या निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती २ कोटी ८१ लाख १३ हजार २११ इतकी होती. या चार वर्षात त्यांच्या संपत्तीत ५२ लाख ६ हजार ११६ रुपयांनी वाढ झालेली आहे. चिंतामण वनगा यांनी लढविलेल्या खासदारकीच्या निवडणूकीत त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती २ कोटी ८४ लाख ९ हजार ६८४ होती. मात्र त्यांचे सुपुत्र श्रीनिवास यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील संपत्ती फक्त ५४ लाख इतकी कमी दिसत आहे. याचाच अर्थ वडीलोपार्जित असलेली मालमत्ता कुटुंबांतर्गत विभागली गेली असल्याने त्यांची संपत्ती कमी दिसत असण्याची शक्यता आहे.

आकडे किती खरे किती दडवलेले
अनेक चतुर राजकारणी या निवेदनातही हेराफेरी करीत असतात. त्यामुळे त्यावर कितपत विश्वास ठेवावा असा प्रश्न असतो. शरद पवारांच्या मालकीची एकही कार नाही. असे त्यांचे संपत्तीचे विवरण सांगते. ते त्यांच्या पत्नीची कार वापरतात. असेही त्यात नमूद केलेले आहे. काही राजकारण्यांनी तर आपल्या पत्नीपेक्षा आपण गरीब आहोत असे दाखविणारी आपल्या संपत्तीची प्रतिज्ञापत्रे उमेदवारी अर्जासोबत सादर केल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. मालमत्ता आपली पण तिची कागदोपत्री मालकी नातेवाईकांच्या नावे असा शॉर्टकटही वापरतात.

Web Title: Damu Shingada is the richest and most poor candidate of Gahla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.