वाडा-कुडूसमध्ये वाढतेय दंडुकेशाही
By Admin | Published: February 15, 2017 04:27 AM2017-02-15T04:27:18+5:302017-02-15T04:27:18+5:30
काही दिवसापूर्वी एका टेम्पो चालकाने विक्रमगड तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला नाहक मारहाण केली होती.
वाडा : काही दिवसापूर्वी एका टेम्पो चालकाने विक्रमगड तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला नाहक मारहाण केली होती. तर रविवारी सायंकाळी एस.टी. चालकाला व वाहकाला दंडुक्याने बेदम चोपले. या शिवाय भांडणाच्या किरकोळ घटना तर नेहमीच घडत असतात. मात्र त्यांच्याकडे डोळे झाक होतेय.
ही मोठी बाजारपेठ असल्याने आजू बाजूच्या ५२ गांव खेडयातील नागरिक व किरकोळ व्यापारी खरेदीसाठी येथे येतात. सर्व बँका काही कार्यालय मराठी, हिंदी, इंग्रजी शाळा या निमित्ताने मोठया प्रमाणात माणसांची वर्दळ येथे असते. त्यातच येथील रस्ता रुंदीकरणाअभावी अपुरा असल्याने वाहनांची कोंडी होते. यातून रस्ता काढतांना अनेकवेळा वाहनांचा माणसांना कि ंवा दुसऱ्या वाहनाला धक्का लागतो. मात्र येथील स्थानिक याचा बाऊ करून भांडण उकरून दंडुकेशाही दाखवतात. यात पोलीसदेखील बघ्याची भूमिका घेतात. तर कधी तक्रार दाखल करून न घेता स्थानिकांना पाठीशी घालतात.
एक महिला मुलाला घेऊन एस.टी.बस मधून उतरतांना बस थोडी हलली त्यामुळे तीने चालकाला फटकारले. यात दोघांची बोलाचाली झाली. वाहक समजविण्यासाठी खाली आला हे पाहून एका अज्ञात इसमाने दंडुक्याने दोघांना ठोकले पोलीसांनी गुन्हा दाखल न करता महिलेची व मारहाण करणाऱ्यांची बाजू घेवून चालक-वाहकाला वाटेला लावले. त्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले की म्हातारी मेल्याचे दु:ख नाही तर दंडुकेशहीला खतपाणी घातले जाते, हे वाईट आहे. भिवंडीतील घटना ताजी असतांना ही घटना घडल्याने नागरिकांत व चालक-वाहकांत चर्चेचा विषय झाला आहे.
(वार्ताहर)