रेती उत्खननामुळे भाईंदर पुलाला धोका?, रात्रीच्या वेळी रेतीचोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 11:35 PM2020-03-01T23:35:08+5:302020-03-01T23:35:16+5:30
नायगाव-भाईंदर यांना जोडणारा रेल्वे पूल रेती उत्खननामुळे धोक्यात आला आहे.
वसई : नायगाव-भाईंदर यांना जोडणारा रेल्वे पूल रेती उत्खननामुळे धोक्यात आला आहे. रेल्वे पुलाच्या जवळच रात्री १२ ते पहाटे ५ दरम्यान सक्शन पंपाद्वारे ५ ते ६ बोटींद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन केले जात असल्याचे निदर्शनास आले असून कारवाईची मागणी केली जात आहे.
भाईंदर-नायगाव रेल्वे पुलावरून दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करीत असतात. या पुलाच्या पश्चिमेकडे रेतीमाफियांकडून सक्शन पंपाद्वारे मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन केले जात असल्याची माहिती मच्छीमारांनी दिली. दरम्यान, शनिवारी पहाटे काही मच्छीमारांनी रेती उत्खनन करणाऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न असता त्यांनी रेती उत्खनन करण्यास आम्हाला आमच्या मालकाने सांगितले आहे, असे उत्तर दिले.