दर्यादील... बोटमालकाने जाळ्यात अडकलेला 1500 किलो वजनाचा 'देवमासा' सोडून दिला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 03:50 PM2021-05-13T15:50:01+5:302021-05-13T21:08:01+5:30

बोटमालकाने नुकसान सहन करून दिले जीवदान !

Daryadil ... The boat owner released the 'Devmasa' weighing 1500 kg trapped in the vasai | दर्यादील... बोटमालकाने जाळ्यात अडकलेला 1500 किलो वजनाचा 'देवमासा' सोडून दिला 

दर्यादील... बोटमालकाने जाळ्यात अडकलेला 1500 किलो वजनाचा 'देवमासा' सोडून दिला 

googlenewsNext

वसई - भाईंदरच्या उत्तन समुद्रात 10 ते 15 नोटिकल अंतरावर बुधवारी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या सहारा बोटीच्या जाळ्यात देवमासा अडकल्याची माहिती समोर आली आहे. उत्तनच्या समुद्रात सापडलेला हा देवमासा अंदाजे 15 ते 20 फुट लांब होता. इतका मोठा मासा जाळ्यात आल्याने बोटीवरील मच्छिमारांची एकच तारांबळ उडाली होती. 

या देवमाश्याचे वजन जवळपास 1500 किलो असल्याचे ही सांगितले जात आहे. दरम्यान मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छिमार बोटीच्या जाळ्यात अचानक अडकलेल्या महाकाय देवमाश्याला अखेर जीवनदान देण्याचे मच्छिमारांनी ठरवले आणि चक्क त्याला सोडवण्यासाठी मच्छिमारांनी 2 तास शर्तीचे प्रयत्न केले. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर मच्छिमारांनी अक्षरशः जाळे कापून त्याची सूटका केली

देवमाशाला जीवनदान देण्याऱ्या त्या बोटमालक डेव्हिड गऱ्या यांच्या बोटीचे व जाळ्याचे मोठं नुकसान झाले आहे. डेव्हिड यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार केला होता आणि आता त्याआधारे मत्स्य विभागाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्यांच्याकडून अर्ज केला जाणार आहे.
 

Web Title: Daryadil ... The boat owner released the 'Devmasa' weighing 1500 kg trapped in the vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.