चिखले समुद्रकिनारी आढळले मृत डॉल्फिनच्या पोटात कासव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 11:04 PM2020-03-07T23:04:43+5:302020-03-07T23:05:14+5:30
स्थानिकांनी पाहिले दुर्मिळ चित्र। पशुवैद्यक अभ्यासकही आश्चर्यचकित
डहाणू / बोर्डी : चिखले समुद्रकिनाऱ्यावरील खाडीपाडा येथे मृत डॉल्फिन आढळला असून त्याच्या पोटात सागरी कासव असल्याचे व्यायामाला जाणाºया स्थानिकांनी पाहिले. हा दुर्मिळ प्रकार असल्याने वन्यजीव आणि पशुवैद्यक अभ्यासकांनाही त्यामुळे आश्चर्यचकित केले आहे.
शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चिखले खाडीपाडा किनाºयावर मृत डॉल्फिन आढळला होता. त्याच्या शरीराचे भटके कुत्रे लचके तोडत असल्याचे लक्षात येताच महेश सुरती आणि शैलेश गोंधळेकर या स्थानिकांनी पहिले. शरीर कुजल्याने तसेच कुत्र्यांनी लचके तोडल्याने पोटातील आतडी आणि काही भाग स्पष्टपणे दिसत होता. यामध्ये डॉल्फिनने भक्ष केलेल्या सागरी कासवाचे संपूर्ण शरीर होते. डॉल्फिनने कासवाचा मानेकडून गिळंकृत केले होते. हे कवच साधारणत: दीड फूट लांबीचे असावे अशी माहिती प्रत्यक्षदर्शिनी दिली.
दरम्यान, तज्ज्ञांच्या मते डॉल्फिनचे खाद्य खेकडे आणि लहान मासे असताना कासवाला भक्ष कसे काय केले याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून अनेकांना विश्वास बसलेला नाही. त्यामुळे या दुर्मिळ प्रकाराची चर्चा रंगत आहे.