मृत्यू झाला आजारपणाने, दोष मात्र प्रकल्पाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 06:20 AM2018-02-02T06:20:36+5:302018-02-02T06:20:47+5:30

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू मार्फत पाचगणीतील ब्लुमिंगडे स्कूल अँड कॉलेज येथे सातवीत शिकणाºया श्रद्धा सुभाष गवळी या विद्यार्थिनीचा आजारपणाने मृत्यू झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली.

 Death due to illness, the blame is to the project only | मृत्यू झाला आजारपणाने, दोष मात्र प्रकल्पाला

मृत्यू झाला आजारपणाने, दोष मात्र प्रकल्पाला

Next

डहाणू : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू मार्फत पाचगणीतील ब्लुमिंगडे स्कूल अँड कॉलेज येथे सातवीत शिकणाºया श्रद्धा सुभाष गवळी या विद्यार्थिनीचा आजारपणाने मृत्यू झाल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली. शाळेत निवासी शिक्षण घेणाºया आदिवासी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचा नाहक बळी जात असल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे.
तालुक्यातील रायपूर गावच्या गवळीपाडा येथे राहणारी श्रद्धा गवळी ही महाबळेश्वर येथील पाचगणीच्या या शाळेत सातवी इयत्तेत शिक्षण घेत होती. १९ जानेवारी रोजी तिची प्रकृती बिघडल्याने तिच्यावर उपचार सुरू असल्याचे शाळेने डहाणू प्रकल्प तसेच पालकांना कळविले होते. त्यानंतर २१ तारखेला तिच्या वडिलांनी शाळेतून तिला घरी आणले. या वेळी तिच्यावर उपचार करणार असल्याचे लिखित हमीपत्र त्यांनी दिल्याचे शाळेने म्हटले आहे. २६ जानेवारीला तिला डहाणूतील कीर्ती रुग्णालयात दाखल केले होते. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने घरी घेऊन जात असल्याची माहिती तिच्या काकांनी कळविल्याचे प्रकल्प कार्यालयाचे म्हणणे आहे. दरम्यान, ३१ जानेवारीच्या सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. दरम्यान, निवासी शिक्षण घेणाºया आदिवासी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने शोषण, आजारपण तसेच आत्महत्या आदि प्रकारातून नाहक बळी जात असल्याच्या घटना समोर येत असल्याचे वांगड यांचे म्हणणे आहे.

शाळा अन् प्रकल्पाला दोष

तिचा मृत्यू शाळा आणि डहाणू प्रकल्पाच्या बेजबाबदारपणामुळे झाला असून दोषी अधिकाºयांची चौकशी करून कारवाई करावी. अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल अशी माहिती आदिवासी अस्मिता पालघर या संघटनेचे अध्यक्ष विलास लक्ष्मण वांगड यांनी लोकमतशी बोलताना दिली.
 

Web Title:  Death due to illness, the blame is to the project only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.