योग्य उपचारांअभावी सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू; पालघर ग्रामीण रुग्णालयावर नातेवाइकांचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 09:53 AM2023-07-28T09:53:33+5:302023-07-28T09:53:51+5:30

जिल्ह्यात आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला असून, त्यातून रुग्णांना जीव गमवावा लागत आहे.

Death of young woman due to snake bite due to lack of proper treatment; Relatives blame Palghar Rural Hospital | योग्य उपचारांअभावी सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू; पालघर ग्रामीण रुग्णालयावर नातेवाइकांचा ठपका

योग्य उपचारांअभावी सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू; पालघर ग्रामीण रुग्णालयावर नातेवाइकांचा ठपका

googlenewsNext

हितेन नाईक, पालघर : पालघर पूर्व भागातील वेवूर येथील सोनाली विष्णू धामोडा (वय २७) या तरुणीला सर्पदंश झाल्यानंतर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांकडून सोनाली धामोडा उपचारांत हयगय झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. मात्र डॉक्टरांनी आरोप फेटाळला आहे. जिल्ह्यात आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला असून, त्यातून रुग्णांना जीव गमवावा लागत आहे.

पालघर पूर्व येथे राहणाऱ्या सोनाली हिला गुरुवारी मध्यरात्री झोपेत मण्यार जातीच्या विषारी सर्पाने दंश केल्याने तिला उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी एकही डॉक्टर उपस्थित नसल्याने कंपाउंडरने मोबाइलवरून संपर्क साधल्यावर कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेले डॉक्टर पराकुष दांडेकर अर्ध्या तासाने तेथे आले. यानंतर तिच्यावर उपचार सुरू केले, असं वैद्यकीय अधिक्षक दांडेकर यांनी सांगितले. यानंतर डॉ. दांडेकर यांनी एक इंजेक्शन दिले आणि तासभर कोणच आले नाही, असं नातेवाईकांनी सांगितले. तिला अगोदर टीबीचा त्रास होता. त्यामुळे कुठेही साप चावल्याचा व्रण दिसून आला नाही त्यामुळे साप चावल्यानंतर देण्यात येणारे इंजेक्शन दिले नव्हते. पण तासाभरानंतर तिने उलटी केल्याची सांगितल्यानंतर सर्वांची धावपळ उडाली. तिला उपचारादरम्यान एकूण १७ इंजेक्शन दिल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षिका दीप्ती गायकवाड यांनी 'लोकमत'ला दिली.

नातेवाइकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

माझ्या मुलीला दाखल केल्यानंतर अर्ध्या तासानंतर उपचारांना सुरुवात केली. तेव्हा एका इंजेक्शननंतर रात्री दीड ते सकाळी सातदरम्यानच्या मधल्या काळात तिच्यावर योग्य उपचार झाले नसल्याने माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. या प्रकरणी दोषी डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मृत सोनालीच्या नातेवाइकांनी पालघर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता.

वापी येथे नेताना मृत्यू

ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून योग्य पद्धतीने उपचार सुरु होते. सकाळी सात वाजता रुग्णाची ऑक्सिजन पातळी ९६ पर्यंत असल्याचे.. डॉ. गायकवाड यांनी सांगितले. त्यानंतर तिची तब्येत बिघडल्यावर डॉ. उमेश दुम्पलवार यांना बोलाविण्यात आले. तोपर्यंत अत्यवस्थ झालेल्या सोनालीला डॉक्टर नसलेल्या एका रुग्णवाहिकेमधून वापी येथील रुग्णालयात नेले जात असताना मुंबई-अहमदाबाद मार्गावरील चारोटी नाक्याजवळ तिची प्राणज्योत मालवली.

Web Title: Death of young woman due to snake bite due to lack of proper treatment; Relatives blame Palghar Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.